Wrestlers Protest: आतापर्यंत अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (brij bhushan sharan singh) यांच्याविरोधात मैदानात उतरलेले कुस्तीपटू (Wrestlers) आता एकमेकांसोबतच भांडताना दिसत आहेत. देशासाठी एकत्र खेळणाऱ्या या कुस्तीपटूंमध्ये आता दोन गट पडल्याचं चित्र आहे. यामध्ये एकीकडे बृजभूषण सिंह यांना विरोध करणारे पैलवान आहेत. तर दुसरीकडे काही कुस्तीपटू हे आंदोलकांच्यासोबत नाहीत. योगेश्वर दत्त आणि बबिता फोगट (Babita Phogat) ही नावे यातील एकाच गटातील आहेत. सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणारे कुस्तीपटू आणि दुसऱ्या गटातील खेळाडू यांच्यात सध्या ट्विटर वॉर सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. जुनी मैत्री विसरून हे खेळाडून एकमेकांविरोधात उभे आहेत. साक्षी मलिक आणि बबिता फोगटनंतर आता योगेश्वर दत्त (Yogeshwar Dutt) आणि बजरंग पुनिया ( calling each other liars on Twitter) यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरु आहे.
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग आणि योगेश्वर दत्त यांच्या विरोधात कुस्तीपटूंमधील संघर्ष वाढतच चालला आहे. विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी शनिवारी सोशल मीडियावर लाईव्ह येऊन योगेश्वर दत्तवर निशाणा साधला होता. यानंतर योगेश्वर दत्तनेही लाइव्ह येत बजरंग पुनियावर जोरदार टीका केली. 2015 मध्ये योगेश्वर दत्तने त्याची शस्त्रक्रिया आणि फिटनेसचे वास्तव देशापासून लपवले. त्याने त्याच्या तब्येतीबाबत खरे सांगितले आणि शेवटच्या क्षणापर्यंत स्पर्धेत खेळला नाही. दत्तच्या जागी अमित धनखरला संधी मिळू शकली असती, असा आरोप बजरंग पुनियाने लावला आहे. योगेश्वर दत्तला अमेरिकेत झालेल्या २०१५ च्या जागतिक कुस्ती स्पर्धेच्या काही तास आधी अनफिट घोषित करण्यात आले होते.
याला प्रत्युत्तर म्हणून योगेश्वरने बजरंग पुनियाला आव्हान दिले की, 'जर तो खरे बोलत असेल तर त्याने मंदिर किंवा गोठ्यात जावं आणि गायीची शेपटी धरून सांगाव की मी हे सांगितले आहे.'
योगेश्वरने ट्विटर लाइव्हवर येत आपली बाजू मांडली आहे. "आज पैलवान लाइव्ह आले होते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग वगळता आता मला लक्ष्य केले जात आहे. पहिली गोष्ट म्हणजे तो एक पैलवान आहे, कदाचित आजच्या काळात तो कुणालाही स्वतःहून मोठा मानणार नाही आणि सध्या तो कुस्तीमध्येही चांगला आहे हेही खरे आहे. कधीकधी माझ्याकडेही यायचा. जवळपास 8-9 वर्षे झाली आणि मी काय केले? कोणी काय केले हे संपूर्ण कुस्ती जगाला माहीत आहे आणि देव जाणतो," असे योगेश्वर म्हणाला.
"माझ्यावर खूप मोठा आरोप लावला आहे. 2018 च्या राष्ट्रकुल खेळापूर्वी मी त्याला सांगितले होते की, तू आशियाई खेळांना जा आणि मी राष्ट्रकुल खेळांना जाईन, असा आरोप लावला गेला आहे. आपण हिंदू आहोत आणि हिंदू धर्मात आपण गाईला सर्वात जास्त मानतो. एका देवळातील गोठ्यात जाऊन गायीची शेपटी धरून बजरंगने सांगावं की योगेश्वरने असं सांगितले होते. मी देवाला साक्षी ठेवून गाईची शेपूट धरून सांगतो की, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2018 बद्दल मी कधीच तुझ्याशी बोललो नाही. देव याला साक्षी आहे. मी ही गोष्ट बोललो असेल तर देवाने आत्ताच माझे जीवन संपवावे, असेही योगेश्वनरने म्हटलं आहे.
— Yogeshwar Dutt (@DuttYogi) June 24, 2023
दरम्यान, हा सगळा वाद ट्रायलमध्ये सूट मिळण्याबाबत आहे. दोन ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू आमनेसामने आल्याने आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी चाचण्यांमध्ये सूट देण्याच्या चर्चेनंतर हा वाद सुरू झाला आहे. याआधी ट्विटरवरही साक्षी मलिक आणि बबिता फोगट यांच्यात जोरदार भांडण झाले होते. बबिता फोगटने साक्षीवर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीसोबत मिळून राजकारण केल्याचा आरोप केला होता. तर साक्षीनेही बबिताला खडे बोल सुनावले होते. दुसरीकडे कुस्तीपटूंच्या या भांडणामुळे क्रीडाविश्वातच एकच चर्चा सुरु आहे.