युसुफ पठानने सीआरपीएफ जवानांसोबत साजरी केली दिवाळी

संपूर्ण देशभरात दिवाळीचा उत्साह पहायला मिळत असून मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात येत आहे. याच उत्साहात क्रिकेटरही सहभागी होत आहेत.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 19, 2017, 11:28 PM IST
युसुफ पठानने सीआरपीएफ जवानांसोबत साजरी केली दिवाळी title=

नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात दिवाळीचा उत्साह पहायला मिळत असून मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात येत आहे. याच उत्साहात क्रिकेटरही सहभागी होत आहेत.

सर्वच क्रिकेटर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. मात्र, क्रिकेटर युसूफ पठान याने असं काही केलं आहे की, ज्यामुळे सर्वचजण त्याचं कौतुक करत आहेत.

युसुफ पठान याने अशा काही लोकांसोबत दिवाळी साजरी केली आहे जे आपल्या घरापासून दूर राहून देशाची सेवा करत असतात. होय, युसुफ पठान याने भारतीय सैन्यासोबत दिवाळी साजरी केली आहे.

बुधवारी दिवाळीच्या निमित्त युसुफ पठान आपल्या बडोदा येथील घरी पोहोचला. बडोदा विमानतळावर सर्व लोक मिठाई आणि गिफ्ट्स आपल्या परिवारासाठी घेऊन जात असल्याचं त्यानं पाहीलं. तर, त्याच ठिकाणी सीआरपीएफचे जवान आपलं कर्तव्य निभावत होते.

विमानतळावरील दृष्य पाहिल्यानंतर युसुफ पठानने तेथे उपस्थित सीआरपीएफच्या जवानांना मिठाई भरवली. तर, जवानांनीही युसुफ पठानला मिठाई भरवली. या वेळी क्लिक करण्यात आलेले फोटोजही युसुफ पठानने ट्विटरवर शेअर केले आहेत