मि. खानचा सागरिकाच्या कोल्हापूर घरातील पहिला फोटो

२३ नोव्हेंबर रोजी विवाह बंधनात अडकलेल्या झहीर खान आणि सागरिका घाटगेची भरपूर चर्चा होत आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 5, 2017, 08:09 PM IST
मि. खानचा सागरिकाच्या कोल्हापूर घरातील पहिला फोटो  title=

मुंबई : २३ नोव्हेंबर रोजी विवाह बंधनात अडकलेल्या झहीर खान आणि सागरिका घाटगेची भरपूर चर्चा होत आहे. 

अगदी साधेपद्धतीने कोर्ट मॅरेज केल्यानंतर या दोघांनी २७ नोव्हेंबरला मुंबई रिसेप्शन ठेवलं. लग्नानंतरचे सर्व विधी पार करून ही जोडी पहिल्यांदा सागरिकाच्या कोल्हापूरच्या घरी गेली आहे. 

 

Mr khans first visit home. #kolhapur @zaheer_khan34

A post shared by Sagarika (@sagarikaghatge) on

कोल्हापूरला गेल्यानंतर मिस्टर खानने सर्वात प्रथम कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. मिस्टर खान आता आपल्या सासरवाडीत म्हणजे सागरिकाच्या घरी खूप छान दिवस घालवत असल्याच समोर आलं आहे. सागरिकाने स्वतः हा फोटो सोशल मीडियावर शेअर केलं आहे. तिने लिहिलं आहे की मिस्टर खान फस्ट व्हिजिट होम.... 

 

झहीर आणि सागरिकाने आपल्या बॉलिवूड, क्रिकेट आणि इतर जवळच्या मंडळींसाठी मुंबईत रिसेप्शन ठेवलं. त्यानंतर ही दोघेजण लंडनमध्ये खास रोमान्स करताना देखील दिसले. लग्नानंतर दोन दिवसात एका मॅग्झीनच्या कर्व्हर पेजवर दोघं एकत्र झळकले. याचे फोटोज झहीर आणि सागरिकाने इंस्टाग्रामवर शेअर केले होते. आता या फोटोशूटचा एक व्हिडोओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे फोटोशूट ऑक्टोबरमध्ये झाले होते. मॅग्झीनच्या जस्ट मॅरीड विशेषांकात दोघं झळकतील. 

 

Thank you Urmi for always helping me to keep it simple . @makeupbyurmikaur @nancy6sutaria_hair_makeup

A post shared by Sagarika (@sagarikaghatge) on

 

@weddingnama

A post shared by Sagarika (@sagarikaghatge) on

२४ एप्रिलला या दोघांनी आपल्या नात्याला रिंग सेरेमनी करून नाव दिलं. सागरिका आणि झहीर एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत होते अशी चर्चा होती. मात्र या विवाहसोहळ्यानंतर चर्चांना पूर्ण विराम मिळालं आहे.