'ZEE5'टायटल स्पॉन्सर असलेली नॉर्थन वॉरियर्स टी-१० क्रिकेट लीगच्या फायनलमध्ये

युएईमध्ये सुरु असलेल्या टी-१० लीगच्या दुसऱ्या मोसमातली फायनल नॉर्थन वॉरियर्स आणि पखतून्समध्ये होणार आहे.

Updated: Dec 2, 2018, 09:12 PM IST
'ZEE5'टायटल स्पॉन्सर असलेली नॉर्थन वॉरियर्स टी-१० क्रिकेट लीगच्या फायनलमध्ये title=

शारजाह : युएईमध्ये सुरु असलेल्या टी-१० लीगच्या दुसऱ्या मोसमातली फायनल नॉर्थन वॉरियर्स आणि पखतून्समध्ये होणार आहे. टी-१० क्रिकेट लीगच्या दुसऱ्या मोसमात नॉर्थन वॉरियर्सचं टायटल स्पॉन्सर ZEE5 आहे. यावर्षी टी-१० क्रिकेट लीगमध्ये नव्यानं सामील झालेल्या ३ टीमपैकी नॉर्थन वॉरियर्स ही एक टीम आहे. ZEE5 झी एन्टरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचा एक ग्लोबल डिजीटल एन्टरटेनमेंट प्लॅटफॉर्म आहे. काही कालावधीपूर्वी ZEE5 १९० पेक्षा जास्त देशांमध्ये लॉन्च करण्यात आलं होतं.

डॅरेन सॅमीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या नॉर्थन वॉरियर्सची यंदाच्या वर्षातली कामगिरी उल्लेखनीय आहे. या मोसमातल्या ६ मॅचपैकी ५ मॅचमध्ये नॉर्थन वॉरियर्सचा विजय झाला आहे. फायनलमध्ये नॉर्थन वॉरियर्सचा सामना शाहिद आफ्रिदीच्या पखतून्सविरुद्ध होणार आहे.

मोहम्मद मोरानी(मॅनेजिंग डायरेक्टर) आणि शाहबाज एलियास(फाऊंडर डायरेक्टर) हे दोघं या टीमचे सहमालक आहे. डॅरेन सॅमी नॉर्थन वॉरियर्सचा कर्णधार आहे आणि भारताचा माजी ऑल राऊंडर रॉबिन सिंग या टीमचा प्रशिक्षक आहे. नॉर्थन वॉरियर्सच्या टीममध्ये पाकिस्तानचा वहाब रियाझ, वेस्ट इंडिजचा ड्वॅन स्मिथ, लेंडल सिमन्स, इंग्लंडचा रवी बोपारा, ऑस्ट्रेलियाचा क्रिस ग्रीन, युएईचा इम्रान हैदर आणि भारताचा अमितोझ सिंग हे महत्त्वाचे खेळाडू आहेत.

टायटल स्पॉन्सर असलेल्या ZEE5नं ट्विटरवर फॅन्ससाठी एक स्पर्धाही घेतली होती. या स्पर्धेतल्या काही विजेत्यांना टी-१० क्रिकेट लीग स्पर्धा पाहण्यासाठी फ्री तिकीट मिळणारेत. तर काहींना नॉर्थन वॉरियर्सची ऑफिशियल मर्चंडाईजही मिळेल.

नॉर्थन वॉरियर्सला टायटल स्पॉन्सर केल्यामुळे आम्ही उत्साही आहोत. नॉर्थन वॉरियर्सच्या टीममध्ये अनेक प्रसिद्ध आणि प्रतिभावान खेळाडू आहेत, असं वक्तव्य ZEE5 ग्लोबलच्या चीफ बिजनेस ऑफिसर अर्चना आनंद यांनी केलं. टी-१० क्रिकेट हे जगात लोकप्रिय व्हायला सुरुवात झाली आहे. तसंच नॉर्थन वॉरियर्सच्या टीममध्ये जगाच्या वेगवेगळ्या भागातले खेळाडू आहेत. ZEE5 सारख्या ग्लोबल ब्रॅण्डला हे पूरक असल्याचंही अर्चना आनंद म्हणाल्या.

काहीच कालावधीपूर्वी आम्ही १९० पेक्षा जास्त देशांमध्ये ZEE5 लॉन्च केलं. दक्षिण आशियातील प्रेक्षकांसाठीही आम्ही 'दिलसे देसी' मोहिम सुरु केली आहे. नॉर्थन वॉरियर्सचं टायटल स्पॉन्सर होण्याची यापेक्षा चांगली वेळ दुसरी नसती, अशी प्रतिक्रिया अर्चना आनंद यांनी दिली.

टी-१० क्रिकेट फॉरमॅट हा ९० मिनिटांचं इंटरटेनमेंट आहे. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक या फॉरमॅटकडे आकर्षित होत आहेत. पहिल्या मोसमापेक्षा दुसऱ्या मोसम जास्त यशस्वी झाला आहे. असं नॉर्थन वॉरियर्सचे सहमालक आणि मॅनेजिंग डायरेक्टर मोहम्मद मोरानी म्हणाले.

वेगवेगळी भाषा आणि त्यातले वेगवेगळ्या विषयांच्या कलाकृती बनवून ZEE5 जगातला सगळ्यात मोठा डिजीटल एन्टरटेनमेंट प्लॅटफॉर्म बनला आहे. नॉर्थन वॉरियर्सला यापेक्षा चांगला टायटल स्पॉन्सर मिळाला नसता, अशी प्रतिक्रिया मोहम्मद मोरानी यांनी दिली.

ZEE5 काही कालावधीपूर्वी १९० पेक्षा जास्त देशांमध्ये लाईव्ह दिसू लागलं. इंग्रजी, तामीळ, हिंदी, मल्याळम, तेलगू, कन्नड, मराठी, बंगाली, ओरिया, भोजपूरी, पंजाबी आणि गुजराती भाषेतून रसिकांना चित्रपट, मालिका, संगीत यारख्या वेगवेगळ्या गोष्टी ZEE5वर पाहता येतात.

कुठे आणि कशी पाहाल नॉर्थन वॉरियर्स-पखतून्सची फायनल?

-नॉर्थन वॉरियर्स आणि पख्तून्समध्ये होणारी टी-१० लीग फायनल मॅच शारजाहच्या शारजाह क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात २ डिसेंबरला खेळवण्यात येणार आहे.

- ही मॅच भारतीय वेळेनुसार रात्री ९.३० वाजता (स्थानिक वेळेनुसार ८ वाजता) सुरु होणार आहे.

- या मॅचचं लाईव्ह प्रक्षेपण सोनी ईएसपीएन आणि सोनी ईएसपीएन एचडीवर दाखवण्यात येईल.

- मॅचचं ऑनलाईन फ्री प्रसारण सोनी लिव ऍपवरही पाहता येईल.