अमळनेर

अमळनेरला संस्थाचालकांच्या त्रासाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या

जळगावमध्ये एका शिक्षकानं विष प्राशन करुन आत्महत्या केलीय. अमळनेर तालुक्यात ही घटना घडलीय. नवल भाऊ कृषि विद्यालयातील विजय गरबड पाटील यांनी विष प्राशन करुन जीवनप्रवास संपवलाय.

Nov 15, 2015, 10:09 PM IST

व्हिडिओ: अमळनेर इथं भाजप-शिवसेना नेत्यांची शेतकऱ्यांना मारहाण

जनतेच्या विकासाचा आणि भल्याचा दावा भाजप शिवसेना युतीचं राज्य सरकार करत आहे. मात्र त्यांचे नेते शेतकऱ्यांवरती लाथाबुक्क्यांचा प्रहार करत आहेत. जळगाव भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेले अमळनेर बाजार समितीचे सभापती उदय वाघ आणि शिवसेनेचे अमळनेर तालुका अध्यक्ष असलेले अनिल अंबर पाटील यांनी अमळनेर बाजार समितीचा बाजार मांडल्याचा आरोप होतोय. 

Oct 25, 2015, 02:13 PM IST

८ ते १० हजार बोगस वोटर शहरात दाखल?

अमळनेर शहरात बोगस वोटिंगसाठी ८ ते १० हजार जण दाखल झाल्याचा आरोप भाजपचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार साहेबराव पाटील, तसेच अनिल भाईदास पाटील यांनी या प्रकरणी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणं मांडलं आहे.

Oct 15, 2014, 02:03 PM IST

अमळनेर येथे ६२ तर सांगलीत ५ लाखांची रोकड जप्त

अमळनेरमध्ये विप्रो रस्ता येथे ६२ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. पाटील प्लाझामध्ये तीन बॅगांमध्ये ही रक्कम सापडली. जगदीश मधुकर चौधरी (रा.नंदुरबार) योगेश भिका चौधरी( रा.नंदुरबार) यांच्याकडील  रोकड निवडणूक अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे. आज सकाळी सांगलीत ५ लाखांची रोकड सापडली.

Oct 11, 2014, 09:00 AM IST

अमळनेरच्या कुटुंबाचा जातपंचायतीकडून छळ

जातपंचायतीच्या बहिष्काराच्या झळा जळगाव जिल्ह्यातील अमळनेर मधल्या एका कुटुंबाला सोसाव्या लागत आहेत. समाज मंगल कार्यालयाच्या अतिक्रमित बांधकामाबद्दल नगरपालिकेकडे केलेल्या तक्रारीचा राग आल्यानं बारी समाज पंचायत मंडळानं रमेश बारी यांच्या कुटुंबाला बहिष्कृत केलंय. पोलिसांकडून योग्यरीत्या प्रकरण न हाताळलं गेल्यानं अखेर याप्रकरणी बारी यांना कोर्टाची पायरी चढावी लागलीय.

Oct 9, 2013, 06:18 PM IST

आणखी एक `प्रिन्स` बोअरवेलमध्ये!

जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर तालुक्यातल्या तांदळी गावातील तीन वर्षाचा चिमुकला बोअरवेलमध्ये पडलाय. शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडलीय. त्याला वाचवण्यासाठी अद्यापही शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Mar 2, 2013, 12:09 PM IST

प्रियाचं फेसबुक A/c भारी, बेतलं`जीवावरी`

फेसबुक आता हे एक व्यसन झालं आहे... ते तुम्हांला जडलं की, मात्र त्याची सवयच तुम्हांला लागून राहते. फेसबुकचा वापर कसा होतो...

Oct 23, 2012, 02:12 PM IST