अमळनेरला संस्थाचालकांच्या त्रासाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या

जळगावमध्ये एका शिक्षकानं विष प्राशन करुन आत्महत्या केलीय. अमळनेर तालुक्यात ही घटना घडलीय. नवल भाऊ कृषि विद्यालयातील विजय गरबड पाटील यांनी विष प्राशन करुन जीवनप्रवास संपवलाय.

Updated: Nov 15, 2015, 11:26 PM IST
अमळनेरला संस्थाचालकांच्या त्रासाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या title=

जळगाव: जळगावमध्ये एका शिक्षकानं विष प्राशन करुन आत्महत्या केलीय. अमळनेर तालुक्यात ही घटना घडलीय. नवल भाऊ कृषि विद्यालयातील विजय गरबड पाटील यांनी विष प्राशन करुन जीवनप्रवास संपवलाय.

संस्थाचालकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं शिक्षकानं सुसाईड नोटमध्ये म्हटलंय. या सुसाईड नोटमध्ये माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्यासह १० जणांचा उल्लेख आहे. या सगळ्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं सुसाईड नोटमध्ये म्हटलंय. 

याप्रकरणी विजय नवल पाटील आणि नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.