आधार कार्ड

धक्कादायक ! अनाथ मुलांना 'आधारकार्ड'चा आधार नाही

अनाथ आश्रमात जी मुलं वाढून मोठी झाली यांच्याकडे वास्तव्याचा पुरावा नसल्यानं या मुलांना आधार कार्ड देण्यात येत नाही.

Aug 21, 2017, 04:00 PM IST

सरकारने ८१ लाख आधार कार्ड केली रद्द, यात तुमचे कार्ड नाही ना, असे करा चेक

देशात आतापर्यंत १११ कोटी लोकांनी आधार कार्ड काढले आहे. १० आकड्यांचा यूनिक आयडी नंबर आज जवळ जवळ सर्वच सरकारी योजनांसाठी महत्वाचा झालाय. तसेच आधार कार्ड सर्वानाच अनिवार्य करण्यात आलेय. मात्र, तुम्हाला माहित आहे का, गेल्या काही दिवसांत ८१ लाख आधार कार्ड रद्द करण्यात आलेत.

Aug 16, 2017, 05:50 PM IST

देशातील तब्बल ९.३ कोटी लोकांचे पॅनकार्ड आधारशी लिंक

पर्मनंट अकाऊंट नंबर म्हणजेच पॅन कार्ड आधारशी लिंक करणे सक्तीचे केल्यानंतर आतापर्यंत तब्बल ९.३ कोटीहून अधिकांनी पॅन आधारशी लिंक केलेत. आयकर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिलीये.

Aug 13, 2017, 08:02 PM IST

आधार कार्डमुळे सापडला हरवलेला सोनू

आधार कार्डची आवश्यकता सध्या देशातील एक चर्चेचा विषय बनला आहे. आधार कार्ड किती फायदेशीर आहे याचचं एक उदाहरण जयपूरमध्ये समोर आलं आहे.

Aug 10, 2017, 04:51 PM IST

'रेल्वे तिकीट बुकिंगसाठी आधार कार्ड बंधनकारक नाही'

रेल्वे तिकीट बुकिंग करताना, आधार नंबर गरजेचा नाही, असं स्पष्टीकरण केंद्र सरकारकडून देण्यात आलं आहे.

Aug 7, 2017, 12:00 AM IST

आता मृत्यूच्या प्रमाणपत्रासाठीही आधार कार्ड बंधनकारक

नवी दिल्ली – आधी सिमकार्ड खरेदी करण्यासाठी आधार कार्ड आवश्यक होतं. त्यानंतर आधार कार्ड आणि पॅन कार्ड जोडण्यास सांगण्यात आलं. मात्र, आता मृत्यूच्या प्रमाणपत्रासाठीही आधार कार्ड बंधनकारक करण्यात आलं आहे.

Aug 4, 2017, 09:09 PM IST

विमान प्रवासासाठी आता डिजिटल आयडी आवश्यक

विमान यात्रा करण्यासाठी आता नवा नियम लागू केला गेला आहे. आता विमानाने प्रवास करण्यासाठी तिकिट बुक करतांना तुमची डिजिटल विशिष्ट ओळख तुम्हाला दाखवावी लागणार आहे. राज्यसभेत याबाबतची माहिती मंगळवारी देण्यात आली.

Jul 26, 2017, 11:19 AM IST

आधार कार्ड सक्ती सुनावणी, सर्वोच्च न्यायालयाचे हे निरीक्षण

खासगी आयुष्यचा हक्क अनिर्बंध हक्क असू शकत नाही. आणि त्यावर निर्बंध घालण्याचे हक्क सरकारला आहेत, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. आधार कार्ड सक्तीविरोधात न्यायालयाने हे निरीक्षण नोंदलेय.

Jul 20, 2017, 06:25 PM IST

आधार कार्ड -पॅन कार्ड जोडण्यासाठी केवळ अर्ज पुरेसा

प्राप्तीकर विभागाने आधार आणि पॅन जोडणे  बंधनकारक केलेय. १ जुलैपूर्वी आधार-पॅन जोडण्याचे बंधनकारक केले होते. मात्र, त्याता आता वाढ दिलेय. दरम्यान, आधार आणि पॅन आता अर्ज करुन तुम्हाला जोडता येणार आहे.

Jul 4, 2017, 09:30 AM IST

आता मंत्रालयातही सर्वसामान्यांना 'आधार' सक्तीचं

मंत्रालयात सर्वसामान्यांना प्रवेशासाठी आता आधार कार्ड सक्तीचे करण्यात आलंय.

Jul 1, 2017, 11:39 AM IST

आधार कार्ड शिवाय नाही मिळणार पॅनकार्ड

जर तुम्ही अजून पॅनकार्ड नसेल बनवलं तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार पॅनकार्डसाठी आधार कार्ड अनिवार्य असणार आहे. शिवाय पॅनकार्डला आधार कार्ड नंबरशी जोडणं ही अनिवार्य झालं आहे.

Jun 28, 2017, 12:43 PM IST

सर्वोच्च न्यायालयाचा आधार कार्डला स्थगिती देण्यास नकार, ३० सप्टेंबरपर्यंत विना 'आधार' मिळणार सर्व लाभ

३० जूनपासून सरकारी योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याच्या अधिसूचनेला स्थगिती देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेतर्फे करण्यात आली. मात्र, न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिलाय. मात्र, पुढच्या सुनावणीदरम्यान, ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्यांना ३० सप्टेंबरपर्यंत सर्व सरकारी योजनांचा लाभ घेता येईल, असे स्पष्ट करण्यात आलेय.

Jun 27, 2017, 04:29 PM IST

आयकर परताव्यासाठी 1 जुलैपासून आधारकार्ड बंधनकारक

आयकर परतावा भरण्यासाठी एक जुलैपासून आधार बंधनकारक करण्यात आलंय. 

Jun 11, 2017, 09:45 AM IST

आयटी रिटर्न भरण्यासाठी आधार सक्तीचे? सुप्रीम कोर्टात आज फैसला

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आणि पॅन कार्ड साठी आधार सक्तीचे असावे का, यावर आज सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे. इन्कम टॅक्स १३९ A A हा कायदा २०१७ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संमत करण्यात आला. 

Jun 9, 2017, 11:00 AM IST