नवी दिल्ली : देशात आतापर्यंत १११ कोटी लोकांनी आधार कार्ड काढले आहे. १० आकड्यांचा यूनिक आयडी नंबर आज जवळ जवळ सर्वच सरकारी योजनांसाठी महत्वाचा झालाय. तसेच आधार कार्ड सर्वानाच अनिवार्य करण्यात आलेय. मात्र, तुम्हाला माहित आहे का, गेल्या काही दिवसांत ८१ लाख आधार कार्ड रद्द करण्यात आलेत.
गेल्या काही दिवसांत सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांना जोडणे बंधनकारक करण्यात आलेय. त्यामुळे इन्कम टॅक्स रिटर्न भरताना आधार अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे आपल्याला माहित असायला हवे की, आपले आधार कार्ड रद्द झाले नाही ना!
- आधार नंबर अॅक्टिव्ह आहे की नाही, हे पाहण्यासाठी काही स्टेप्स. सर्वप्रथम UIDAIच्या संकेतस्थळावर जा. https://uidai.gov.in/ ही आहे लिंक.
- ही लिंक तुम्हाला नव्या पेजवर घेऊन जाईल. ओपन झालेल्या पेजवर आधार कार्ड नंबरची माहिती मागितली जाईल. आधार कार्डनंबर टाका. तुम्ही एक सुरक्षित कोड टाका आणि व्हेरीफायवर क्लिक करा.
- Verify वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळेल. येथे लिहीलेला आधार नंबर ****** Exists. त्यानंतर त्याच्या खाली तुमचे वय आणि तुमचा मोबाईल नंबरची माहिती असेल. हे सर्व तुम्ही लिहिले असेल तर तुमचे आधार कार्ड अधिकृत असेल आणि ते रद्द झालेले नसेल.