'आप'च्या जाहीरनाम्यात दिल्लीकरांवर आश्वासनांची बरसात
महिला सुरक्षा, दिल्लीत १० ते १५ लाख सीसीटीव्ही कॅमेरे, स्वस्त वीज, वाय-फाय, मुबलक पाणी, तरूणांना शिक्षण तसंच रोजगाराची संधी या आणि अशा अनेक आश्वासनांची खैरात करत अरविंद केजरीवाल यांनी आज 'आम आदमी पक्षा'चा जाहीरनामा प्रसिद्ध केला. चार महिन्यांच्या विचारमंथनानंतर हा जाहीरनामा तयार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
Jan 31, 2015, 03:13 PM ISTआम आदमी पक्षाचे नेते मयांक गांधींवर गुन्हा
आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य मयांक गांधी यांच्यासह एकूण सहा कार्यकर्त्यांविरोधात ओशिवरा पोलिसांनी विनयभंग आणि धमकीचा गुन्हा नोंदविला. त्यात एका महिलेचाही सहभाग आहे. पोलीस प्रवक्ते उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी या वृत्तास दुजोरा दिला.
Sep 21, 2014, 01:49 PM ISTभाजपनं दिली होती मुख्यमंत्रीपदाची ऑफर - कुमार विश्वास
'भारतीय जनता पक्षानं आपल्याला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती' असा दावा 'आम आदमी पक्षा'चे नेते कुमार विश्वास यांनी केला आहे. तसंच 'आप'च्या ज्या १२ आमदारांना निवडणुका नको आहेत, तेही विश्वास यांना मुख्यमंत्रीपदासाठी समर्थन द्यायला तयार आहेत, असं आपल्याला सांगण्यात आल्याचं विश्वास यांनी म्हटलं आहे. भाजपनं मात्र हे वृत्त फेटाळून लावलंय.
Aug 30, 2014, 01:57 PM ISTअखेर अरविंद केजरीवाल सरकारी निवासस्थान सोडणार
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतरही गेले तीन महिने सरकारी निवासस्थानात राहणारे आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे अखेर आपला मुक्काम हलवणार आहेत. सरकारी घर सोडण्यासाठी विविध स्तरांतून दबाव आल्यानंतर केजरींनी हा निर्णय घेतला आहे.
Jun 14, 2014, 08:32 PM ISTदिल्लीत सरकार स्थापनेसाठी काँग्रेसचा ‘आप’ला समर्थन प्रस्ताव!
दिल्लीत पुन्हा सरकार स्थापनेसाठी आता नवीन घडामोडी घडतायेत. आम आदमी पक्षानं पुन्हा सरकार स्थापन करावी, यासाठी काँग्रेसनं आपला समर्थन प्रस्ताव ‘आप’ला दिल्याचं कळतंय. मात्र याबद्दल अजून अधिकृतरित्या काही स्पष्ट झालं नाही.
May 18, 2014, 11:08 AM ISTमुस्लिमांनी जातीयवादी व्हावं, शाझिया इल्मींचं वादग्रस्त वक्तव्य
मुस्लिम नागरिकांनी धर्मनिरपेक्षपणा थांबवून मतदान करावं आणि या निवडणुकीत जातीयवादी व्हावं, असं वादग्रस्त वक्तव्य गाझियाबाद इथल्या आम आदमी पक्षाच्या (आप) उमेदवार शाझिया इल्मी यांनी केलं आहे.
Apr 23, 2014, 05:41 PM ISTअभिनेत्री गुल पनाग `आप`मध्ये, चंदीगढमधून निवडणूक लढवणार
आपल्या हास्यानं अनेकांची मनं जिंकणारी आणि दमदार अभिनयानं बॉलिवूडमध्ये छाप पाडणाऱ्या अभिनेत्री गुल पनागनं आता राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि तिनं आम आदमी पक्षात प्रवेश केलाय.
Mar 13, 2014, 05:01 PM ISTआपच्या बेशिस्तीनं मुंबईकर त्रस्त!
आम आदमी पक्षाचे समन्वयक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची मुंबईतली रिक्षातली सवारी आणि लोकलवारी चांगलीच चर्चेची ठरली. केजरीवाल सकाळी साडे दहाच्या सुमारास दिल्लीहून विमानानं आले. त्यानंतर त्यांनी थेट रिक्षातून अंधेरी स्टेशन गाठलं. त्यांच्यासह त्यांचे कार्यकर्तेही रिक्षातूनच आले खरे मात्र यावेळी त्यांनी सर्व वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवल्यानं काही काळ वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती.
Mar 12, 2014, 03:26 PM ISTकेजरीवालांच्या निवडणूक लढवण्यावर येणार बंदी?
अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षाच्या तीन नेत्यांवर निवडणूक आयोगाची टांगती तलवार आहे. निवडणुकीत अधिक खर्च केल्याची तक्रार दिल्ली निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली होती. आयोगाच्या तीन सदस्यीय समितीनं आपल्या रिपोर्टमध्ये याबाबत खुलासा केलाय.
Mar 6, 2014, 11:04 AM ISTराहुलवर `आम आदमी`चा 'लेटर'बॉम्ब...
`आम आदमी पक्षा`चे नेते आणि संयोजक तसंच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आता उघडपणे सरळ सरळ काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर `लेटर` बॉम्ब टाकलाय.
Feb 24, 2014, 12:16 PM ISTबरं आहे 'आप', कपिल भारतात आहे, नाहीतर...
आम आदमी पक्ष (आप)चे नेते आणि अमेठीत राहुल गांधींच्या विरुद्ध उभे ठाकलेले कुमार विश्वास यांच्या विरोधात दिल्लीपासून बंगळुरू आणि केरळपर्यंत विरोध होतोय. आपल्या विविध वक्तव्यांवरुन देशातल्या अनेक भागांत कुमार विश्वास यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आलीय.
Jan 23, 2014, 05:23 PM ISTभटकळच्या सुटकेसाठी अरविंद केजरीवालांच्या अपहरणाचा कट
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धोका असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिलीय. केजरीवाल यांचं अपहरण होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलीय. पोलिसांच्या अटकेत असलेला दहशतवादी यासिन भटकळच्या सुटकेसाठी हा अपहरणाचा कट रचला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलीय.
Jan 20, 2014, 08:21 AM ISTअरविंद केजरीवालांच्या जीवाला धोका, माफिया मागावर
आपल्या ‘झाडू’नं भ्रष्टाचाराला साफ करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती आयबी अर्थात गुप्तचर विभागानं दिलीय. त्यामुळं आता केजरीवालांच्या भोवती सुरक्षा वाढविण्याची तयारी सुरू आहे.
Jan 13, 2014, 11:50 AM ISTराज ठाकरे असं का बोलले?
नाशिकमध्ये राज ठाकरे यांनी आम आदमी पार्टीवर आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली... या टीकेमागची कारणं काय आहेत ? याचा हा आढावा....
Jan 10, 2014, 01:09 PM ISTमहाराष्ट्रात मनसेच ‘आप’चा बाप, राज ठाकरेंनी काढला चिमटा!
नवी दिल्लीमध्ये आम आदमी पक्षानं सत्ता स्थापन केल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपचं अभिनंदन करतांना महाराष्ट्रात मात्र मनसेच ‘आप’चा बाप असल्याचं म्हटलंय. दिल्लीमध्ये काम न केल्याचा काँग्रेसला फटका बसला असंही राज ठाकरे म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिकच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंनी आपली मत मांडली.
Jan 9, 2014, 12:58 PM IST