www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आम आदमी पक्ष (आप)चे नेते आणि अमेठीत राहुल गांधींच्या विरुद्ध उभे ठाकलेले कुमार विश्वास यांच्या विरोधात दिल्लीपासून बंगळुरू आणि केरळपर्यंत विरोध होतोय. आपल्या विविध वक्तव्यांवरुन देशातल्या अनेक भागांत कुमार विश्वास यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आलीय.
भारतात अशाप्रकारचं वक्तव्य केलं म्हणून चालून गेलं, जर परदेशात असं बोलले असते तर आपलं करिअरच गमवावं लागलं असतं. हे फक्त `आप`च्या कुमार विश्वास यांच्याच बाबतीत नाही तर विनोदी कलाकार कपिल शर्मा यालाही लागू पडतं.
कपिल शर्मा आपल्या गर्भवती महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन अडचणीत सापडलाय. तर कुमार विश्वास यांनी नर्सेसबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळं ते ही चांगलेच अडकलेत. मात्र हे वक्तव्य अनेक वर्षांपूर्वीचं असल्याचं त्यांनी सांगितलंय. दिलेली स्क्रीप्ट वाचत होतो, असं स्पष्टीकरण कुमार विश्वास यांनी दिलं.
कुमार विश्वास यांनी एका वाहिनीसोबत बोलतांना स्वत:ला एक `परफॉर्मर` आणि `स्टँड अप कॉमेडियन` म्हटलंय. कुमार विश्वास आणि कपिल शर्मानं जी चूक केलीय ती जर परदेशात केली असती तर त्यांचं करिअर संपलं असतं.
परदेशातील काही उदाहरणं
> ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर डीन जोंस २००६मध्ये श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान झालेल्या टेस्ट मॅचमध्ये क्रॉमेंट्रेटर होता. त्यानं क्रिकेटपटू हाशीम आमला यानं संगकाराच्या घेतलेल्या विकेटनंतर - `द टेररिस्ट हैज गॉट अनॉदर विकेट (दहशतवाद्यानं घेतली आणखी एक विकेट), असं वक्तव्य केलं होतं. ताबडतोब त्याला आपलं काम सोडावं लागलं होतं आणि आजही त्याचं करिअर धुळीला मिळालेलं आहे.
> मायकल रिचर्ड अमेरिकेतील एक प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडियन... त्यानं २००६मध्ये हॉलिवूडच्या एका कार्यक्रमात आफ्रिकन लोकांबद्दल जातीय वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्याला क्षमा तर मागावीच लागली शिवाय त्याचं करिअरही संपलं.
अशी अनेक उदाहरणं परदेशात आहेत. मात्र आता कुमार विश्वास आणि कपिल शर्माचं काय होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.