आरोपी

पुण्यात नवऱ्याने बायकोला पेटवून दिले

बायकोशी झालेल्या वादातून तिला पेटवून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुण्यातल्या मंडई भागात घडलीये… या महिलेचा पती आरोपी शंकर जोगदंड याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केलीय.

Dec 19, 2013, 08:43 PM IST

गंभीर गुन्ह्यांत ‘अल्पवयीन’ला दया-माया नाही!

देशात खळबळ उडवून देणाऱ्या दिल्ली सामूहिक बलात्कार आणि मुंबईतील ‘शक्ती मिल’ सामूहिक बलात्कार करणातील साम्य म्हणजे या दोन्हीही गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश आढळला होता.

Dec 3, 2013, 03:28 PM IST

बलात्कार करणाऱ्या नराधमाची गाढवावरून धिंड

चाकूचा धाक दाखवून इस्लामपूर मधील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडलीये. पिडीत मुलीचे हात पाय बांधून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी आरोपी राहुल मानेला पकडलं आणि पीडित मुलीची सुटका केली. संतप्त नागरिकांनी आरोपी राहुल माने याची गाढवावरून धिंड काढली.

Nov 30, 2013, 03:57 PM IST

मुंबईत तीन ब्रिटीश महिलांची छेडछाड, आरोपी जेरबंद!

मुंबईत तीन ब्रिटीश महिलांची छेडछाड करण्याची घटना घडलीये. काल संध्याकाळी सहाच्या सुमारास ओशिवारा परिसरात हा प्रकार घडला.

Oct 22, 2013, 08:36 AM IST

डॉ. दाभोलकरांच्या हत्येला दोन महिने पूर्ण, तपास कुणीकडे?

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणाच्या तपासाविषयी पोलिसांची बोलती बंद अशी अवस्था झालीय. दाभोलकर यांच्या हत्येला आज दोन महिने झालेत. तरीही मारेकऱ्यांपर्यंत पोहचण्यात पोलिसांना अपयश आलंय.

Oct 20, 2013, 08:23 AM IST

मुंबई गँगरेप प्रकरणातील आरोपींवर आज आरोप निश्चिती

शक्ती मिल गँगरेप प्रकरणातील आरोपींवर आज सेशन कोर्टात आरोप निश्चिती करण्यात येणार आहे. या बलात्कार प्रकरणातील पाच आरोपींनी २२ ऑगस्ट रोजी एका फोटो जर्नलिस्टवर सामूहिक बलात्कार केला होता.

Oct 11, 2013, 12:43 PM IST

कोर्टानं काढली लालू समर्थकांच्या फटाक्यांची वात!

सीबीआयचं विशेष कोर्ट लालू प्रसाद यादव यांना दिलासा देईल अशी त्यांच्या समर्थकांना आशा होती. मात्र आता ती मावळलीय. कारण कोर्टानं त्यांना दोषी ठरवलंय. त्यामुळं सेलिब्रेशनसाठी आणलेले फटाके तसेच राहिलेत.

Sep 30, 2013, 01:44 PM IST

लालूंना तीन वर्षांहून अधिक शिक्षा होणार, खासदारकीही गेली!

३७.७० कोटींच्या चाराघोटाळा प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यासह ४५ जणांना विशेष कोर्टानं दोषी ठरवलंय. मात्र याप्रकरणी आरोपींना शिक्षा कोर्ट आता ३ ऑक्टोबरला सुनावणार आहे.

Sep 30, 2013, 11:43 AM IST

मुंबई गँगरेप: आरोपींना सेशन कोर्टात केलं जाणार हजर

मुंबईत शक्ती मिल कंपाऊंडमध्ये फोटो जर्नालिस्ट तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी आज आरोपींना सेशन कोर्टात हजर केलं जाणारेय. याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचनं १४ सप्टेंबरला आरोपपत्र दाखल केलं होतं. जवळपास ६०० पानांच्या या आरोपपत्रात एकूण ८२ लोकांची साक्ष नोंदवण्यात आलीये.

Sep 23, 2013, 08:37 AM IST

‘उस्मानी पळाला की पळवून लावला?’

दहशतवादी अफझल उस्मानी पोलिसांच्या हातून पळून गेला, ही बाब धक्कादायक आहे. ‘पण, तो पळाला की त्याला पळवून लावलं? हे सरकारचं एक षडयंत्र आहे की काय? असा आरोप भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलाय.

Sep 21, 2013, 04:39 PM IST

ATM मध्ये ग्राहकांना गंडवणाऱ्यांना अटक

नालासोपारा शहरात सिंडीकेट बँकेच्या एटीएमध्ये ग्राहकांना गंडवणा-या तीघा आरोपींना पकडण्यात आलय.त्यांचे कारनामे सीसीटीव्हीत कैद झालेत.

Sep 15, 2013, 08:27 PM IST

दिल्ली गँगरेप : देशभरातील प्रतिक्रिया

दिल्ली गँगरेप प्रकरणातील चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. यावरच देशभरातून एकच प्रतिक्रिया व्यक्त होतेय... ती म्हणजे ‘अखेर निर्भयाला न्याय मिळाला!’

Sep 13, 2013, 03:40 PM IST

सरकारच्या दबावाखाली निर्णय – आरोपींच्या वकिलांचा आरोप

‘सरकारच्या इशाऱ्याखाली कोर्टानं दिल्ली गँगरेप प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावलीय. न्यायाधीशांनी कोणत्याही पुराव्यांना आणि तत्थ्यांना न बघता केवळ सरकारच्या दबावाखाली येऊन हा निर्णय दिलाय’

Sep 13, 2013, 03:21 PM IST

दिल्ली गँगरेप : बलात्काऱ्यांना फाशीच!

आज दिल्लीच्या साकेत कोर्टानं एक ऐतिहासिक निकाल दिलाय. दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुकेश (वय २६), विनय शर्मा (२०), पवन गुप्ता (१९) व अक्षय सिंह ठाकूर (२८) या चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय.

Sep 13, 2013, 02:56 PM IST

दिल्ली गँगरेप : कोर्टानं निर्णय ठेवला राखून, शुक्रवारी सुनावणार शिक्षा

दिल्ली गँगरेप प्रकरणी दिल्लीतील फास्ट ट्रॅक कोर्टानं आपला निर्णय राखून ठेवलाय. दोषी आरोपींना शुक्रवारी दुपारी अडीच वाजता शिक्षा सुनावण्यात येणार आहेत. चारही आरोपींना काल कोर्टानं दोषी ठरवलं.

Sep 11, 2013, 02:22 PM IST