उमेदवार

लोकसभा निवडणूक : काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

काँग्रेसने लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 71 जणांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रात काही ठिकाणी विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आलेली नाही.

Mar 13, 2014, 07:43 PM IST

भाजपची बैठक, मोदी कुठून लढणार लोकसभा निवडणूक?

लोकसभा उमेदवारांची तिसऱ्या यादीसंदर्भात आज भाजपची महत्त्वपूर्ण बैठक होतेय. त्यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. या बैठकीसाठी भाजपचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित असतील.

Mar 13, 2014, 10:36 AM IST

शिवसेनेकडून ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या पुत्राला संधी

ठाण्यात शिवसेनेनं इच्छुकांचे पत्ते कट करत एकनाथ शिंदे यांच्या सुपुत्राला श्रीकांत शिंदेला उमेदवारी देत धक्का दिलाय. तर राष्ट्रवादीने गटातटाच्या राजकारणाला पूर्ण विराम देत कथोरे आणि नाईक यांचे मनोमिलन घडवून आणलं होतं.

Mar 8, 2014, 08:54 PM IST

आज काँग्रेसची पहिली यादी जाहीर होणार?

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावर आज काँग्रेसची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यताय. आतापर्यंत भाजप शिवसेना राष्ट्रवादी आम आदमी पक्षानं आपल्या उममेदवारांची यादी घोषित केलीये.

Mar 7, 2014, 05:46 PM IST

लोकसभा निवडणूक : `भाजप`ची पहिली यादी जाहीर

`आप` आणि `राष्ट्रवादी काँग्रेस`नंतर भाजपनंही लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. भाजपनं जाहीर केलेल्या या पहिल्या यादीत १७ उमेदवार निश्चित करण्यात आलेत.

Feb 27, 2014, 09:57 PM IST

जातीनं केली माती; राष्ट्रवादीची जातीनुसार यादी...

राजकीय पक्षांनी कितीही नाकारलं तरी जातीपातीची गणितं निवडणुकांमध्ये महत्त्वाची ठरतात. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली पहिली यादी जाहीर केलीय. या यादीतल्या नावांवर एक नजर टाकली तर हीच गोष्ट ठळ्ळकपणे दिसून येते.

Feb 27, 2014, 09:13 PM IST

सुरक्षित धुळ्यातला काँग्रेसचा शिलेदार कोण?

काँग्रेससाठी राज्यात सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ म्हणून धुळ्याकडे पाहीलं जातं. अल्पसंख्याक मतदारांची संख्या इथे जास्त असल्यामुळे यामतदार संघातून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची रस्सीखेच सुरू आहे.

Feb 27, 2014, 05:26 PM IST

लोकसभा निवडणूक : 'आप'ची दुसरी यादी

`आप` च्या लोकसभा उमेदवारांची यादी जवळपास निश्चित केली आहे. आजच्या बैठकीत या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे.

Feb 27, 2014, 03:17 PM IST

तयारी लोकसभेची : `राष्ट्रवादी`चे संभाव्य उमेदवार

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील लोकसभा जागावाटपाच्या वाटाघाटी सुरू असतानाच काही महत्त्वाच्या जागांवर उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने निश्चित केले आहेत.

Feb 18, 2014, 04:35 PM IST

राज्यसभा निवडणूक : सात जागा, सात उमेदवार

राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत आज संपणार आहे. मात्र, त्यापूर्वीच या निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट झालंय.

Jan 28, 2014, 12:58 PM IST

काँग्रेसनं लोकसभेच्या सर्व जागा लढवाव्यात- अजित पवार

५ राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल पाहता काँग्रेसनं लोकसभेच्या राज्यातल्या सर्व ४८ जागा लढवाव्यात, असा उपरोधिक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मारलाय.

Dec 13, 2013, 05:38 PM IST

नंदन निलेकणी काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार?

देशभर आधारकार्ड योजना राबवणारे इन्फोसिसचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नंदन निलकेणी यांना काँग्रेसने पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरविणार असल्याचे वृत्त सध्या दिल्लीच्या राजकारणात येत आहे.

Dec 11, 2013, 03:25 PM IST

पुण्याच्या निवडणुकीत आयोगाचीच उधळपट्टी

पुणे महापालिका निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाला आतापर्यंत साडे सहा कोटींचा खर्च आला आहे. निवडणूक आयोग स्वतः निवडणुकीसाठी इतका खर्च करत असताना उमेदवाराला मात्र चार लाखांच्या खर्चाचंच बंधन होतं.

Feb 23, 2012, 08:57 PM IST

'मनसे'तील बंड, अखेर झाले थंड

दादरच्या बालेकिल्ल्यात मनसे आपली बंडाळी थोपविण्यात यश आलं आहे. बहुतांश बंडोखांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे, तर उमेदवारीपासून डावलण्यात आलेले नाराज आता राजीखूशी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचाराला लागले आहेत.

Feb 4, 2012, 10:26 PM IST

पुण्यातले 'मालामाल' उमेदवार

पुण्यातले आमदार, खासदारच नाही तर नगरसेवक आणि जिल्हा परिषद उमेदवारांची मालमत्ताही कोटींच्या घरात आहे.

Feb 2, 2012, 09:47 PM IST