औरंगाबाद

अशोक चव्हाण राजकारणात पुन्हा सक्रीय

आदर्श घोटाळ्यानंतर जणू नांदेडपर्यंतच मर्यादित राहिलेले अशोक चव्हाण आता निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा रिंगणात उतरले आहेत.. ब-याच महिन्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी नांदेड सोडून औरंगाबादमध्ये दोन सभा घेतल्या. त्यांच्या देहबोलिवरून आता अशोच चव्हाण पुन्हा जोमाने दंड थोपटून राजकारणार परतणार अशीच चिन्हं दिसत आहेत.

Feb 15, 2014, 01:51 PM IST

औरंगाबादमध्ये दोन तरुणींवर सामूहिक बलात्कार

औरंगाबादच्या भांगसी माता परिसरात दोन मुलींवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडलीये.

Feb 8, 2014, 03:02 PM IST

`व्हिडिओकॉन`ला कर्मचाऱ्यांकडूनच ७२ लाखांचा गंडा

संगणकीय बनावट नोंदी करून ११ कर्मचाऱ्यांनी व्हिडिओकॉन कंपनीच्या गोदामातील तब्बल पावणेआठ कोटी रुपयांचे मोबाईल हॅंडसेट लंपास केले. याप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Feb 7, 2014, 01:43 PM IST

निवडणुकीच्या रिंगणात आता पान टपरीवाला

निवडणूकांचे वेध सगळ्यांनाच लागलेत. त्यातच आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारी कर्मचारी असो वा शिक्षक कुणीही यातून सुटलं नाही. याच चढाओढीत आता पान टपरीचालकांनी उडी घेतलीय. मागण्या मान्य करून घेण्यासाठी राज्यातील टपरीचालक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या रिंगणात उतरणार आहे.. त्यामुळे पानानं तोंड लाल करणारे हात निवडणुकीत किती रंगत आणतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे...

Feb 5, 2014, 10:16 PM IST

धक्कादायक: अभ्यासच जीवावर बेतला

अभ्यास करणंही जिवावर बेतू शकतं हे औरंगाबादच्या एका घटनेवरून सिद्ध झालय. अभ्यास करत नसल्याची तक्रार केली म्हणून मावस भावानंच मावस भावाचा खून केल्याचं औरंगाबादेत समोर आलंय. या खूनाच्या प्रकरणानं औरंगाबाद हादरलय.. किशोरवयीन मुलांच्या मानसिकतेचा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

Feb 3, 2014, 09:57 PM IST

औरंगाबादमध्ये संशयास्पद स्फोटात ३ ठार

औरंगाबादमध्ये एक वेल्डिंगच्या दुकानात संशयास्पद स्फोट झाला असून यामध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय, तर तिघे जण गंभीर जखमी झालेत.

Feb 2, 2014, 11:30 PM IST

पक्षांची ऑफर, पण राजकारण नको- नाना

औरंगाबादेत पहिल्या आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्धघाटनानंतर अभिनेता नाना पाटेकरनं राजकीय पक्षांची आपल्या शैलीत टर्र उडवली..

Jan 30, 2014, 10:52 PM IST

खाकी वर्दीतला अवलिया

एरवी पोलीस म्हटलं की, खाकी वर्दीतला जनतेचा मित्र ही छबी डोळ्यांसमोर येते. मात्र या खाकी वर्दीतल्या माणसातही एखादा कलाकार असतोच. औरंगाबादमधले एक पोलीस काका सिनेमांसाठी लावण्या लिहीतात आणि पोलीस बँडच्या माध्यमातून कलेची जोपासनाही करतात.

Jan 11, 2014, 08:03 PM IST

पित्यानेच सावत्र आईच्या मदतीने चार वर्षांच्या मुलाला चटके

महिलांबरोबरच लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनात दिवसोंदिवस वाढ होतेय. पित्यानेच सावत्र आईच्या मदतीने चार वर्षांच्या मुलाला चटके दिल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. शेजारऱ्यांनी माणुसकी दाखवत बाल कल्याण समितीची मदत घेऊन या लहानग्याची या त्रासातून सुटका केलीय.

Jan 9, 2014, 11:28 PM IST

औरंगाबादमध्ये सेना-भाजपचं सेटेलमेंट, झालं गेलं गंगेला...

औरंगाबादचा गड अबाधित राखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ३१ डिसेंबर २०१३ ला शिवसेना खासदार चंद्रकांत खैरै आणि भाजप नगरसेवक संजय केनेकर यांच्या हाणामारी झाली होती. त्यामुळे युतीमध्ये दरार पडण्याची शक्यता होती. यावरून दोन्ही बाजुने तोडगा काढून झालं गेलं गंगेला मिळालं सांगून सेटलमेंट करण्यात आलेच.

Jan 4, 2014, 10:46 AM IST

औरंगाबाद पालिकेतील शिवसेना-भाजप वाद मावळणार

औरंगाबाद महापालिकेच्या सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीमध्ये सरतं वर्षही वादानंच मावळणार असं चित्र आहे. २०१३ ची शेवटची सर्वसाधारण सभा आज होणार आहे. मात्र महापौरांवर आरोप करत या सभेवर भाजपने बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.

Dec 31, 2013, 07:50 AM IST

मेणबत्तीच्या गोडाऊनला भीषण आग; जीवितहानी नाही

औरंगाबादच्या चिखलठाणा एमआयडीसी भागात मेणबत्तीच्या गोडाऊनला भीषण आग लागलीय. या आगीत जवळजवळ तीन कोटींचं नुकसान झालंय.

Dec 12, 2013, 06:32 PM IST

चक्क कारची काच फोडून ६९ लाख पळविलेत

कारची काच फोडून तब्बल ६९ लाखाची रोख लंपास केल्याची घटना औरंगाबाद मध्ये घडली. शहरातील उद्योजकाने जमिनीचा व्यवहार करण्यासाठी ही रोख रक्कम रजिस्ट्री कार्यालयात आणली होती.

Dec 5, 2013, 07:18 PM IST

एवढी छोटी बाईक कधी पाहिलीत का तुम्ही?

औरंगाबादमधील मेकॅनिकल इंजिनीअरिंगला शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या शेख अफरोजने आपल्या कल्पनेतून चक्क १० x १० इंचाची गाडी तयार केलीय. या गाडीची नोंद लवकरच ‘लिम्का बुक ऑफ रेकोर्ड’मध्ये केली जाणार आहे.

Nov 23, 2013, 08:45 PM IST

पॉलिटेक्निक पहिल्या वर्षाचा गणिताचा पेपर फुटला, आजची परीक्षा रद्द

राज्यात पुन्हा एकदा पेपरफुटीमुळं विद्यार्थ्यांना फटका बसलाय. औरंगाबादमध्ये आज होणारा पॉलिटेक्निक पहिल्या वर्षाचा पहिल्या सेमिस्टरचा गणिताचा पेपर फुटलाय. यामुळं आज सकाळी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली असून आता हा गणिताचा पेपर ४ डिसेंबरला घेतला जाणार आहे.

Nov 23, 2013, 12:02 PM IST