औरंगाबाद

दादांची ‘स्विट डिश’ अधिकाऱ्यांना पडली ‘लय भारी’

आपल्या उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची गोष्टच ‘लय भारी’... त्यांची अनेक वादग्रस्त वक्तव्यही ‘लय भारी’ अन् त्यांचे अनेक किस्सेही ‘लय भारी’... हा त्याचाच पुढचा भाग... 

Jul 16, 2014, 11:46 AM IST

औरंगाबादेत अनेक पुरस्कार प्राप्त अधिकारी अकार्यक्षम..

मनपा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी नगरसेवकांवर छळाचा आरोप केलाय. छळाला कंटाळून डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी निवृत्तीसाठी अर्ज केलाय. आणि आता पुन्हा महापालिकेत जायचं नाही असा पवित्रा घेतलाय. मात्र डॉ. जयश्री कुलकर्णी अकार्यक्षम असल्याचा आरोप महापौर, उपमहापौरांसह नगरसेवकांनी केलाय.

Jul 11, 2014, 07:46 PM IST

मराठवाड्याच्या सर्व मागण्या सायडिंगला, शिवसेना खासदार नाराज

रेल्वे बजेटमधून मराठवाड्याची घोर निराशा झाली आहे. जनतेच्या तोंडाला पानंच पुसल्या गेल्याची भावना जनतेमध्ये आहे. मराठवाड्याच्या कित्येक प्रलंबित प्रश्नावर रेल्वेबजेटमध्ये चकारही नसल्यानं हेच का अच्छे दिन असा प्रश्न जनतेला पडलाय. 

Jul 8, 2014, 05:26 PM IST

औरंगाबादमध्ये पाण्याची बोंबाबोंब

औरंगाबाद तसा पाण्याचा नेहमीचाच ठणठणाट.. शहराला तीन दिवसाआड तर, कुठे 4 दिवसाआड पाणीपुरवठा होतो. मात्र औरंगाबाद महापालिकेच्या घोडचुकीमुळे रोज लाखो लीटर पाणी वाया जात आहे. त्याकडे मात्र कुणाचंही लक्ष नाही... जायकवाडी ते औरंगाबाद या मार्गावर हजारो लिटर पाण्याची नासाडी दिवसरात्र सुरुय... मात्र महापालिका आता दुष्काळाच्या नियोजनाच्या गप्पा मारतेय...

Jul 5, 2014, 02:44 PM IST

वादळी पावसाचा तडाखा, चार जणांचा बळी

जळगाव जिल्यात वादळी वा-यासह पाऊसाने हजेरी लावली खरी मात्र या वादळी पाऊसामुळे चार जण ठार झाले. तसच केळीच कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. ३५ ते ४० घराचंही नुकसान झालंय. तर औरंगाबाद जिल्ह्यात पावसाचे नुकसान झालेय.

Jun 13, 2014, 12:19 PM IST

बीड - औरंगाबाद महामार्गावरील अपघातात 8 ठार

बीड - औरंगाबाद महामार्गावर झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. अपघातात ठार झालेले सर्व आंबेजोगाईचे रहिवासी आहेत. हा अपघात सकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास झाला.

Jun 12, 2014, 01:24 PM IST

औरंगाबादमध्ये चक्क चिमुकल्यांची भाजीमंडी

भाजीपाला खरेदीसाठी आपण नेहमीच बाजारात जातो, तुम्ही म्हणाल त्यात विशेष ते काय ? पण अशी आहे खास भाजी मंडीई. जिथं तुम्हाला भाजी खरेदी करण्य़ाचा एक वेगळाच आनंद मिळेल. ही आहे चिमुकल्यांची भाजीमंडी. हा आहे उन्हाळी सुट्टीतला खास उपक्रम.

May 9, 2014, 09:15 PM IST

पाझर तलावात पाणी नाही पण ‘पैसा’ पाझरला!

औरंगाबाद पाझर तलाव योजनेत भ्रष्टाचार उघड झालाय. जालना जिल्ह्यातल्या पाझर तलाव घोटाळा प्रकरणी औरंगाबाद लाच-लुचपत विभागाने सिंचन विभागातल्या चार माजी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

May 2, 2014, 10:01 PM IST