www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
भाजीपाला खरेदीसाठी आपण नेहमीच बाजारात जातो, तुम्ही म्हणाल त्यात विशेष ते काय ? पण अशी आहे खास भाजी मंडीई. जिथं तुम्हाला भाजी खरेदी करण्य़ाचा एक वेगळाच आनंद मिळेल. ही आहे चिमुकल्यांची भाजीमंडी. हा आहे उन्हाळी सुट्टीतला खास उपक्रम.
मुलांना बाजारज्ञान व्हावं, व्यवहार कळावा यासाठी औरंगाबादच्या एका संस्थेनं ही चिमुरडयांची भाजी मंडी भरवलीयं. इथं सर्व प्रकारच्या भाज्या आहेत. कुणी पालक विकतयं, कुणी कांदे. कुणी कारले तर कुणी वांगे.उन्हाळा असल्यानं शीतपेयही आहेत आणि कांदाही. भेळेची लज्जतही इथ चाखायला मिळेल. या भाजी बाजारात कुणी सखुबाई झालयं तर कुणी पाटील मामा. सगळ्याचं मिशन एकच बाजारात मांडलेला आपला माल विकायचाच.
या भाजी बाजाराचा उद्देश आहे मुलांना वेगवगळ्या वजनांची ओळख व्हावी...पैश्याची देवाणघेवाण कशी होते ते समजावं. आपण जी भाजी रोज खातो ती आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी किती जण कष्ट घेतात याची जाणिव व्हावी. भातकुलीचे खेळ खेळण्याच्या वयात ही मुलं खरीखुरी भाजी विकतायत. कुणी सांगावं यामधला एखादा चिमुकला उद्या एखादा बडा रिटेल व्यापारीही होईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.