www.24taas.com, - अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर
चोरी करण्याकरता चोर रोज नवीन फंडे शोधून काढतात. कधी विक्रेत्याच्या रूपाने घरात शिरतात, तर कधी फसवणूक करण्याकरता पोलिसांचेच रूप धारण करतात. पण नागपूरच्या या चोरांनी मात्र चोरीचा नवीनच फंडा शोधून काढला.
२-३ दिवसाचे वर्तमान पत्र या घराच्या दारात अडकलेले आहे याचा सरळ-सरळ अर्थ की घरमालक बाहेर गेले आहे. या सोबतच पुजेची फुलपुडी जर घराबाहेर याच प्रकारे लटकली असले तरीही त्याचा तोच अर्थ होतो. नागपूरच्या या चोरांनी नेमका चोरी करण्या करता हाच फंडा वापरला. हे चोर दिवसा रेकी करायचे आणि कुठे चोरी करायची ते ठरवायचे.
नागपूरच्या अंबाझरी पोलिसांनी बंद घरी घरफोड्या करणाऱ्या या ३ आरोपींच्या टोळीला अटक त्याच्या चोरीमागचे हे सिक्रेट शोधून काढले.
पोलिसांनी जप्त केलेल्या मुदेमाला मध्ये १ किलो चांदीचे दागिने, ६ तोळे सोन्याचे दागिने, सोन्याचे दागिने आणि ७० हजाराची रोकड जप्त केली आहे. आरोपींनी चोरलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने हे नागपूरच्या पारडी येथील महालक्ष्मी ज्वेलर्स मध्ये विकायचे. पोलिसांनी सराफा व्यापाऱ्याकडून सर्व मुद्देमाल जप्त केलाय. महत्वाच म्हणजे तीनही आरोपी हे २० ते २२ वयोगटातील आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी ११ घरफोड्यांची कबुली दिली आहे.
या घटनेतील प्रमुख आरोपी राहुल उर्फ छोटू सूर्यवंशी हा संशयितरित्या फिरताना आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून विचारपूस केली तेव्हा त्याने आपल्या तीन साथीदारासह घरफोड्या करत असल्याची कबुली दिली. आरोपी राहुलने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी रोशन सिंग आणि देवानंद शिरसाठला अटक करून अंबाझरी पोलिसांनी चोरीचा हा अनोखा फंडा शोधून काढला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.