कसोटी क्रिकेट

शोएब मलिकची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिकने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. शारजात इंग्लंड विरूद्ध झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर शोएबने ही घोषणा केली आहे.

Nov 3, 2015, 09:21 PM IST

युनूस खानने सचिन तेंडुलकर आणि ब्रॅडमन यांना मागे टाकलं

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा क्रिकेटर युनूस खान याने असा विक्रम केला जो क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत महान फलंदाज डॉन ब्रॅडमन आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही करता आलेला नाही. 

Jul 7, 2015, 05:42 PM IST

भारतीय संघात धोनीच्या जागी कोण? विराटने दिलं उत्तर...

भारतीय संघाचा उपकर्णधार विराट कोहलीनं धोनीच्या जागी टेस्ट मॅचमध्ये कोण खेळणार याचा खुलासा केला आहे. दिल्ली डेअरडेविल्ससोबतच्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट बोलत होता. 

Apr 27, 2015, 12:22 PM IST

जयवर्धनेकडून कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

श्रीलंकन टीमचा माजी कर्णधार जयवर्धनेने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Jul 15, 2014, 04:15 PM IST

सीईओ सत्या, कसोटी क्रिकेट आणि रशियन कादंबरी

मायक्रोसॉफ्टचे नवे सीईओ सत्या नडेला यांचं क्रिकेटशी अनोखं नातं आहे. क्रिकेटने आपल्याला भरपूर काही शिकवलं असं नडेला यांनी म्हटलं आहे. नडेला यांना सर्वात जास्त कसोटी क्रिकेट आवडतं.

Feb 5, 2014, 04:45 PM IST

मास्टर ब्लास्टर सचिन होणार निवृत्त

सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. याबाबत बीसीसीआयने जाहीर केलं आहे. सचिन २०० व्या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे, असं बीसीसीआयने म्हटलं आहे.

Oct 10, 2013, 04:05 PM IST

तिलकरत्ने दिलशान कसोटी क्रिकेटमधून निवृत्त

श्रीलंकेचा सलामीचा फलंदाज तिलकरत्ने दिलशान याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची आज घोषणा केली आहे. येत्या सोमवारी ३७ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दिलशानने, कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे सांगताना मर्यादीत षटकांचे सामने मात्र खेळणार असल्याचे जाहीर केलं आहे.

Oct 9, 2013, 05:43 PM IST

पाकिस्तानचा ४९ रन्समध्ये खुर्दा

आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानला सर्वात कमी म्हणजे ४९ रन्समध्ये गुंडाळण्याची कामगिरी दक्षिण आफ्रिकेने केलीय.

Feb 2, 2013, 08:39 PM IST

धोनी आता केवळ तीन पावलं दूर....

टीम इंडियाचा लिमिटेड ओव्हर्समधील सर्वोत्कृष्ट कॅप्टन कोण असं कोणी विचारलं तर बहुतेक जण कॅप्टन कूल धोनीचचं नाव घेतील.

Nov 14, 2012, 03:29 PM IST

भारतीय क्रिकेटर्सची आयसीसी पुरस्कारांमध्ये पीछेहाट

गेल्या वर्षभरात वाईट कामगिरी केल्यामुळे भारतीय कसोटी टीमचा एकही सदस्य आयसीसीच्या टेस्ट टीममध्ये आपलं नाव मिळवू शकला नाही. ‘वर्षातील सर्वश्रेष्ठ टेस्ट क्रिकेटर’ आणि ‘सर्वश्रेष्ठ क्रिकेटर’ या दोन्ही पुरस्कारांमध्येही एकाही भारतीय खेळाडूचं नाव नाही. इंग्लंड आणि द. आफ्रिकेच्या खेळाडूंचा मात्र या टीममध्ये दबदबा आहे.

Aug 30, 2012, 04:33 PM IST

टेस्टमध्ये बनवणार टीम इंडिया टॉप- सचिन

वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाला पुन्हा टेस्ट चॅम्पियन बनण्याचे वेध लागले आहेत. भारताच्या दौ-यावर येणा-या इंग्लंड विरूद्ध टेस्ट सीरिज जिंकून, पुन्हा टेस्टमध्ये बेस्ट बनण्याचा मानस मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केलाय. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात सपाटून मार खाणा-या टीम इंडियाकडे, टेस्ट रँकिंगमध्ये पुन्हा एकदा चमकण्याची संधी आहे.

Jun 2, 2012, 06:54 PM IST

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज शतकवीर तंबूत

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज शतकवीर डेव्हिड वॉर्नरनंची खेळी १८० रन्सवर संपुष्टात आली. ईशान शर्माने उमेश यादवकडे कॅच देण्यास भाग पाडून विकेट पदरात पाडली. ऑस्ट्रेलियाची स्थिती चार बाद २९७ रन्स आहे.

Jan 14, 2012, 04:20 PM IST

ऑस्ट्रेलिया ऑलआऊट

पर्थ टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं पहिल्या इनिंगमध्ये ३६९ रन्स केले. ऑस्ट्रेलियाचे बॅटमन्स धावांचा डोंगर उभा करणार असे वाटत असताना टीम इंडियाच्या बॉलर्सनी शेवटी कमाल केली. ऑस्ट्रेलियाचे बॅटमन्स झटपट बाद करत त्यांची खेळी ३६९ रन्सवर रोखली.

Jan 14, 2012, 03:47 PM IST

सचिन बाद, टीम इंडियाकडून निराशा

टीम इंडियाकडून पुन्हा निराशा झाली. सचिन तेंडुलकरला ८ रन्सवर संशयास्पद बाद देण्यात आले. खुद्द सचिनने नाराजी व्यक्त केली. ८५ रन्सच्या बदल्यात ४ विकेट टीम इंडियाने गमावल्यात.

Jan 14, 2012, 03:33 PM IST

ऑस्ट्रेलियाला दिला दणका

ऑस्ट्रेलियाचे बॅटमन्स धावांचा डोंगर उभा करणार असे वाटत असताना टीम इंडियाच्या बॉलर्सनी शेवटी कमाल केली. ऑस्ट्रेलियाचे बॅटमन्स झटपट बाद केलेत. ऑस्ट्रेलियाची स्थिती ९ विकेट ३६१ रन्स अशी आहे.

Jan 14, 2012, 02:06 PM IST