मास्टर ब्लास्टर सचिन होणार निवृत्त

सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. याबाबत बीसीसीआयने जाहीर केलं आहे. सचिन २०० व्या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे, असं बीसीसीआयने म्हटलं आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 10, 2013, 04:50 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई
सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. याबाबत बीसीसीआयने जाहीर केलं आहे. सचिन २०० व्या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे, असं बीसीसीआयने म्हटलं आहे.
ठळक मुद्दे
सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार - बीसीसीआय
देशासाठी खेळणे हे माझ्यासाठी गौरवास्पद - सचिन
-क्रिकेटशिवाय जीवन ही कल्पनाच करवत नाही
-देशासाठी खेळणे हे माझे स्वप्न होते
‘देशासाठी क्रिकेट खेळणे हे माझे आयुष्यभराचे स्वप्न होते. गेल्या २४ वर्षांमधील प्रत्येक दिवस मी जे स्वप्न अक्षरश: जगलो. क्रिकेटशिवाय माझ्या आयुष्याची मी कल्पनाही करू शकत नाही. कारण, वयाच्या ११ व्या वर्षांपासून मी फक्त हेच केले आहे. जगभरामध्ये माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, हा माझा सन्मानच आहे. आता मायदेशामध्ये मला २००वा कसोटी सामना खेळण्याची संधी मिळत आहे. त्या पार्श्वआभूमीवर मी निवृत्तीची घोषणा करतो'
----------------------------------------सचिन तेंडुलकर
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने निवेदन प्रसिद्धीस देत कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. २०० वा कसोटी सामना वेस्टइंडिज सचिन खेळणार आहे. गेल्या वर्षी सचिनने वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
२००कसोटी खेळण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठल्यानंतर सचिन निवृत्त होईल, अशी अटकळ बांधली जात होती. तसेच, निवृत्तीसंदर्भात काही घोषणा करण्याविषयीही सचिनला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) सूचना केल्या जात होत्या, अशीही चर्चा होती. त्या पार्श्वडभूमीवर सचिनने ‘बीसीसीआय'मार्फत आज गुरुवारी निवृत्तीचे निवेदन प्रसिद्धीस दिले. तर गेल्या वर्षी वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती घेतानाही सचिनने ‘बीसीसीआय'च्या माध्यमातून निवेदन प्रसिद्धीस दिले होते.
सचिनने बीसीसीआयला पाठवलेल्या पत्रात आपल्या भावना पुढील प्रकारे जाहीर केल्या.
सचिनचे पत्र जसेच्या तसे
MEDIA RELEASE Sachin Tendulkar has contacted the President, BCCI, and has requested the BCCI to release the following statement to the Media, on his behalf: "All my life, I have had a dream of playing cricket for India. I have been living this dream every day for the last 24 years.
It’s hard for me to imagine a life without playing cricket because it’s all I have ever done since I was 11 years old. It’s been a huge honour to have represented my country and played all over the world. I look forward to playing my 200th Test Match on home soil, as I call it a day. I thank the BCCI for everything over the years and for permitting me to move on when my heart feels it`s time! I thank my family for their patience and understanding.
Most of all, I thank my fans and well-wishers who through their prayers and wishes have given me the strength to go out and perform at my best.
----- Sachin Tendulkar

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.