गुजरात

पुढील २४ तासांत 'अशोबा' चक्रीवादळ धडकण्याचा धोका

अरबी समुद्रात खोल दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळं 'अशोबा' या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. येत्या २४ ते ३६ तासांत हे वादळ उग्र रूप धारण करू शकतं. 

Jun 9, 2015, 07:37 PM IST

दिल्ली, केरळनंतर आता गुजरातमध्ये मॅगीचे नमुने तपासणीसाठी

दिल्लीमध्ये मॅगीचे १३ पैकी १० नमुने सदोष आढळल्यानंतर, आता तबब्ल ३९ नमुने गुजरातमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. गुजरातमधल्या अहमदाबाद, बडोदा, सुरत आणि राजकोट इथं मॅगीचे हे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. 

Jun 3, 2015, 10:25 AM IST

अबब! लोकसंगीताच्या कार्यक्रमात साडेचार कोटींची उधळपट्टी

गुजरातच्या जामनगरमध्ये प्रसिद्ध गायक कीर्तीदान गढवी यांच्या भजन कार्यक्रमात पैशांचा अक्षरक्षा पाऊस पडला. इथं जमलेल्या लोकांनी एक नाही, दोन नाही तर तब्बल साडेचार कोटी रुपये या गायकावर उधळले.

Jun 1, 2015, 10:22 AM IST

चुकीच्या कामासाठी व्यापाऱ्यांपुढे झुकणार नाही- उद्योगमंत्र्यांची भूमिका

धातू उद्योगातल्या व्यावसायिकांनी उद्योग मुंबईतून गुजरातला हलवण्याची धमकी दिल्यानं खळबळ माजली होती. मात्र विक्रीकर विभागाच्या दहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेल्या थकबाकीतून सूट मिळावी यासाठीचं मेटल व्यापाऱ्यांनी दबाव टाकल्याचं उघड झालंय. 

May 18, 2015, 07:21 PM IST

किंमती ऐवज लुटून, नवरीलाही पळवलं दरोडेखोरांनी

लग्नावरून परतत असतांना शस्त्रधारी दरोडेखोरांनी किंमती ऐवज तर लुटलाच, मात्र नवरीलाही ते घेवून गेले. ही धक्कादायक घटना गुजरातच्या गरबरामध्ये घडली आहे. 

May 18, 2015, 07:04 PM IST

कच्छमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के

 गुजरातमधील कच्छ येथेही  बुधवारी भूकंपाचे हादरे बसले. कच्छ परिसरात आज सकाळी ७ वाजून १२ मिनिटांनी भूकंपाचे हादरे बसले. 

May 13, 2015, 09:24 PM IST

पती काळा, पत्नीने काढला कायमचा काटा

गुजरातमधील वडोदरा येथे धक्कादायक बाब उघड झाली आहे. पती रंगाने काळा असल्याने एका मुलाच्या आईने पतीला संपवून टाकले.

Apr 26, 2015, 05:36 PM IST

पाकिस्तानी बोटीचे गूढ कायम, दाऊद कनेक्शन

पोरबंदरजवळ पकडण्यात आलेल्या पाकिस्तानी बोटीचं गूढ वाढलंय. तब्बल ६०० कोटींचं ड्रग या बोटीतून पकडण्यात आलंय. बोटीतले सर्व आठही तस्कर कोस्टगार्डने ताब्यात घेतले आहेत. मात्र या बोटीचं दाऊद कनेक्शन असल्याचा गुप्तहेरांचा संशय आहे.

Apr 22, 2015, 08:17 PM IST

भारतीय हद्दीत ड्रग्जनं भरलेली पाकिस्तानी बोट; ८ जण ताब्यात

भारतीय नौसेना आणि कोस्टगार्डनं सोमवारी एका पाकिस्तानी बोटीला भारताच्या हद्दीत जप्त केलंय. यावेळी ८ संशयितांना अटकही करण्यात आलीय. 

Apr 21, 2015, 03:45 PM IST

देशातली पहिली स्मार्ट सिटी... मोदींच्या गुजरातमध्ये!

तेजीनं वाढणाऱ्या शहरांमधील लोकसंख्येमुळे प्रत्येकाला घर उपलब्ध करून देण्यासाठी तसेच गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्यासाठी सराकारचा जोर 'स्मार्ट' शहरांवर आहे. याच धर्तीवर एक स्मार्ट सिटी गुजरातच्या साबरमती नदीच्या किनाऱ्यावर उभारली जातेय. 

Apr 16, 2015, 04:10 PM IST