पोरबंदर : भारतीय नौसेना आणि कोस्टगार्डनं सोमवारी एका पाकिस्तानी बोटीला भारताच्या हद्दीत जप्त केलंय. यावेळी ८ संशयितांना अटकही करण्यात आलीय.
सुरक्षा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे अभियान भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौसेनेच्या एका संयुक्त टीमनं हाताळलं. तस्करीसाठी ही बोट वापरली जात होती, अशी माहिती मिळतेय. या बोटीत जवळपास ६०० करोड रुपयांचा ड्रग्ज हस्तगत केल्याची माहिती मिळतेय.
दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर नौसेना आणि कोस्टगार्ड संयुक्त रुपात ऑपरेशन 'सागर सुरक्षा कवच' चालवत आहेत. सोमवारी पेट्रोलिंगदरम्यान कोस्टगार्डची नजर एका संशयित बोटीवर पडली. कोस्टगार्डनं ही बोट थांबवण्याचा प्रयत्न केला.
चौकशी दरम्यान ही बोट पाकिस्तानची आहे आणि यात ड्रग्ज असल्याचं समजतंय. भारतीय जल हद्दीत पकडलेली ही बोट पोरबंदर इथं आणली गेलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.