कोलकातापुढे १९१ रन्सचं टार्गेट
आयपीएल सीझन ५ मध्ये चेन्नई सुपरकिंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात फायनल मॅच रंगतेय.
May 27, 2012, 10:22 PM ISTदिल्लीचा पराभव करत चेन्नईची फायनलमध्ये धडक
आजच्या सेमीफायनलमध्ये ८६ रन्सनं दिल्ली डेयरडेव्हिल्सचा पराभव करत चेन्नई सुपरकिंग्जनं आयपीएल सीझन ५ च्या फायनलमध्ये धडक मारलीय.
May 25, 2012, 11:59 PM ISTधर्मशाळेत पंजाबने चेन्नईचा गाशा गुंडाळला
पंजाब किंग्ज इलेव्हनने चेन्नई सुपरकिंग्जचा ६ गडी आणि तब्बल २१ चेंडू राखून पराभव करत प्ले ऑफमध्ये चेन्नई पोहचण्याच्या शक्यता जवळपास नाहीशी केली आहे. पंजाबचा कर्णधार गिलख्रिस्टने एक बाजू लावून धरीत नाबाद ६४ धावाची खेळी करीत विजयी खेचून आणला. या विजयाने पंजाबचे आता १६ गुण झाले असून त्यांचा शेवटचा सामना शनिवारी दिल्लीशी होणार आहे.
May 17, 2012, 08:28 PM ISTचेन्नईचा ब्राव्हो विजय!
अत्यंत चुरशीच्या सामन्यात शेवटच्या चेंडुवर ५ धावांची गरज असताना चेन्नई सुपर किंग्जच्या ब्राव्होने षटकार लगावत कोलकत्ता नाइट रायडर्सवर ५ गडी राखून विजय मिळविला. या विजयामुळे चेन्नईचे सुपर ४ मध्ये जाण्याचे आव्हान टीकले आहे. १७ गुणांसह चेन्नई सुपरकिंग्ज चौथ्या स्थानावर आहे.
May 14, 2012, 11:57 PM ISTचेन्नई सुपरकिंग्जचा दिल्लीवर विजय
चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली डेअरडेव्हील्सवर 9 गडी राखून विजय मिळविला. मुरली विजय 48 तर सुरेश रैना 28 धावांवर नाबाद राहिले. चेन्नईसमोर 115 धावांचे आव्हान होते. मात्र मायकल हसी आणि मुरली विजय यांनी हे आव्हान लीलया पेलले.
May 12, 2012, 11:12 PM ISTचेन्नईचा डेक्कन चार्जर्सवर १० धावांनी विजय
चेन्नई सुपर किंग्जने आज डेक्कन चार्जर्सवर १० रन्सनी विजय मिळवला. आज नाणेफेक जिंकून चेन्नई सुपरकिंग्जने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर चेन्नईने २० षटकात ६ गडी गमावत १६० धावा केल्या आणि डेक्कनला विजयासाठी १६१ धावांचे लक्ष्य दिले होते.
May 5, 2012, 12:01 AM IST