कोलकातापुढे १९१ रन्सचं टार्गेट

आयपीएल सीझन ५ मध्ये चेन्नई सुपरकिंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात फायनल मॅच रंगतेय.

Updated: May 27, 2012, 10:22 PM IST

www.24taas.com, चेन्नई 

आयपीएल सीझन ५ मध्ये  चेन्नई सुपरकिंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात फायनल मॅच  रंगतेय. चेन्नईनं आपल्या बॅटींगच्या धडाक्यानं मॅचची सुरुवात केलीय. बॅटसमननं आपली कमाल दाखवत कोलकात पुढे १९१ रन्सचं तगडं आव्हान ठेवल्यानंतर आता चेन्नईचे बॉलर्स आपली कमाल दाखवण्यासाठी सज्ज झालेत.

 

आपल्या घरच्या मैदानावर टॉस जिंकून चेन्नईच्या महेंद्रसिंग धोनीनं पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. २० ओव्हर्समध्ये ३ बाद १९० रन्स देऊन चेन्नईनं कोलकाताला ‘गंभीर’ व्हायला लावलं. सुरेश रैनानं ७३, मायकल हसीनं ५४, मुरली विजयनं ४२ तर कॅप्टन धोनीनं नॉट आऊट १४ रन्स दिले. फायनल मॅचमध्येही चेन्नईनं आक्रमकपणे अर्धशतकी सलामी दिली. पहिल्या ६ ओव्हर्समध्ये चेन्नईनं ५४ रन्सवर मजल मारली.

 

आयपीएल सीझन ५ मधली आजच्या फायनल मॅचची सगळ्यांनाच उत्सुकता लागून आहे.  चेन्नई सुपरकिंग्जचा कॅप्टन महेंद्रसिंग आणि कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन गौतम गंभीर या दोघांसाठी ही मॅच महत्त्वाची आहे, याच वादच नाही. आयपीएलमध्ये चौथ्यांदा फायनलमध्ये धडक मारणारी आणि आयपीएलचे दोन सीझन घशात घालणारी चेन्नई यंदाही हॅट्ट्रीक करणार का, की ‘गंभीर’ टीम पहिल्यांदाच आयपीएल जिंकून आपल्याला सिद्ध करणार? याकडे सगळ्याच क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून आहे.

 

चेन्नई सुपर किंग्ज – महेंद्र सिंग धोनी (कॅप्टन), मुरली विजय, मायकल हसी, सुरेश रैना, ड्वेन ब्रावो, एल्बी मोर्कल, रवींद्र जडेजा, सुब्रह्यण्यम बद्रीनाथ, रविचंद्रन अश्विन, बेन हिल्फेनहास आणि शादाब जकाती.
कोलकाता नाइट रायडर्स - गौतम गंभीर (कॅप्टन), मानविंदर बिस्ला, जॅक कॅलिस, युसुफ पठाण, शाकिब अल हसन, लक्ष्मीरतन शुक्ला, देवव्रत दास, रजत भाटिया, इक्बाल अब्दुल्ला, सुनील नरीन आणि ब्रेट ली