चौकशी

मुंडेंच्या अपघाताची CBI चौकशीबाबत मोदी निर्णय घेतील - गडकरी

केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला झालेल्या अपघाताच्या CBI चौकशीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतील, असं नितीन गडकरींनी म्हटलंय. काल आपण मोदी आणि मुंडेंच्या कुटुंबियांशी चर्चा केली.

Jun 5, 2014, 10:50 PM IST

`मुंडेंच्या अंत्यसंस्कार यात्रेत वारंवार केला बदल म्हणून...`

दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडेंच्या अंत्यसंस्कार यात्रेच्या मार्गात वारंवार बदल केल्यानंच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी म्हटलंय.

Jun 5, 2014, 12:26 PM IST

परळीतील दगफेकीची चौकशी करा - पंकजा पालवे-मुंडे

गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराच्यावेळी जी दगडफेक झाली ती मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी केली नाही. असे त्यांचे कार्यकर्ते नाही. दगडफेक करणारे मुंडे साहेबांचे समर्थक नाहीत, दगफेकीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कन्या आमदार पंकजा पालवे-मुंडे यांनी केली आहे.

Jun 4, 2014, 07:57 PM IST

वडेरांची सुरक्षा काढण्याची प्रियांकाची मागणी

रॉबर्ट वडेरा यांना दिलेली एनएसजी सुरक्षा काढून घेण्यात यावी, अशी मागणी खुद्द प्रियांका वडेरा यांनीच केलीये. प्रियांका यांनी एनएसजी संचालकांना पत्र पाठवलंय.

May 30, 2014, 10:50 PM IST

उत्तर प्रदेशात दोन अल्पवयीन मुलींची गँगरेपनंतर हत्या

उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार घडलाय. इथल्या बदायू जिल्ह्यात दोन अल्पवयीन मुलींवर गँगरेप करून मग त्यांची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. एवढंच नव्हे तर हत्येनंतर दोन्ही मुलींचे मृतदेह झाडाला लटकलेले आढळले. याप्रकरणी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

May 29, 2014, 12:56 PM IST

कोकण रेल्वे अपघात, मुख्यमंत्र्यांकडून जखमींची विचारपूस

कोकण रेल्वेला नागोठणेजवळ झालेल्या अपघातातल्या जखमींची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सायन हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतलीय. सायन हॉस्पिटलमध्ये 15, केईएममध्ये 18 जणांना दाखल करण्यात आलं असून त्यापैकी 3 जणांची प्रकृती गंभीर आहे.

May 5, 2014, 10:44 AM IST

सीबीआय दाभोलकरांच्या हत्येच्या चौकशीस तयार

डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची चौकशी करण्यास सीबीआय तयार आहे. सीबीआयने यावर मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे.

Apr 23, 2014, 04:18 PM IST

सुनंदा पुष्कर यांची हत्या? तपासात प्रगती नाही

केंद्रीय मंत्री शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूच्या प्रकरणात कुठलीही प्रगती झालेली नाही. व्हिसेरा अहवालात त्यांनी औषधाचं अतिसेवन केल्याची बाब समोर आली आहे. मात्र, या अहवालातील नोंदी या गुन्हा नोंदवण्यासाठी पुरेशा नसल्याचं म्हटलं आहे.

Mar 24, 2014, 08:42 AM IST

५४ हजाराच्या घराची चौकशी, कारवाई करणार - मुख्यमंत्री

पवईसारख्या उच्चभ्रू एरियात केवळ ५४ हजारांमध्ये घर मिळणार, या आशेनं मुंबईकरांनी मंत्रालयाबाहेर लांबच लांब रांगा लावल्या. घरांसाठी अर्ज करण्यासाठी बेघर मुंबईकरांची अक्षरशः झुंबड उडाली. परंतु ही अफवा असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय..त्यामुळं स्वस्त घरांचं मुंबईकरांचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलंय. दरम्यान, या अफवा प्रकरणाची चौकशी करून दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केलंय.

Feb 5, 2014, 06:53 PM IST

अमेरिकेची `एफबीआय` करणार जियाच्या मृत्यूचा तपास?

अभिनेत्री जिया खानच्या मृत्यू प्रकरणाला नवं वळण लागलंय. जियाची आई राबिया खान यांनी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रावर नाराजी व्यक्त केलीय आणि या प्रकरणी अमेरिकन तपास यंत्रणा `एफबीआय`नं तपास करावा अशी मागणी केलीय.

Jan 23, 2014, 11:39 AM IST

आदर्श घोटाळा : १२ अधिकाऱ्यांची पुन्हा होणार चौकशी

आदर्श इमारत घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर चौकशीची टांगती तलवार आहे. घोटाळ्यात ठपका असलेल्या १२ आयएएस अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

Jan 22, 2014, 01:07 PM IST

सुनंदा पुष्कर गूढ मृत्यू: झी मीडियाचा मोठा खुलासा!

सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी झी मीडियानं मोठा खुलासा केलाय. सुनंदा यांच्या मृत्यूनंतर २४ तासांत झी मीडियाच्या कॅमेऱ्यात हॉटेल लीलाची दृष्यं कैद झालीत. याच हॉटेलच्या रुम नं. ३४५ मध्ये सुनंदा यांचा मृतदेह आढळला होता..

Jan 19, 2014, 09:54 AM IST

सुनंदा पुष्कर यांच्यावर अंत्यसंस्कार; थरुर यांच्या अडचणी वाढल्या

सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचं गूढ कायम आहे. औषधांचा ओव्हरडोस हे मृत्यचं कारण असू शकतं. अलीकडच्या काळात त्यांचं मद्यपानाचं प्रमाण वाढलं होतं. धुम्रपानाचं प्रमाणही वाढलं होतं असं सूत्रांनी दिलेल्या माहितीत कळतंय. दरम्यान दुपारी २ वाजेपर्यंत पोस्टमॉर्टेम सुरू राहणार आहे. थरूर यांचा ड्रायव्हर तसंच इतर स्टाफचीही चौकशी होणार आहे.

Jan 18, 2014, 01:12 PM IST

आता, हेरिटेज समितीचीच होणार चौकशी!

शिवाजी पार्क हेरिटेज म्हणून जाहीर करणाऱ्या मुंबईतील हेरिटेज समितीचीच चौकशी करण्याची घोषणा नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत केली.

Dec 19, 2013, 03:24 PM IST

आसाराम बापूंची आता सूरत पोलिसांकडून चौकशी

सूरतमध्ये दोन बहिणींनी केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळं आता आसाराम बापू आणि त्यांचा मुलगा नारायण साईंवरील संकट वाढतांना दिसतायेत. गुजरात पोलिसांनी आज आसाराम बापूंची जोधपूरहून अहमदाबादला रवानगी केलीय. आता अहमदाबादमध्ये पोलीस बापूंची चौकशी करेल.

Oct 14, 2013, 04:56 PM IST