जालना

ऑडिट जालना जिल्ह्याचं

स्टील सिटी, बियाण्यांची पंढरी, कापडाची मराठवाड्यातली सर्वात मोठी बाजारपेठ अशी जालन्याची ओळख. त्यामुळे राजकीय दृष्ट्याही जालना हा मराठवाड्यातील एक अत्यंत महत्वाचा जिल्हा.

Oct 8, 2014, 03:20 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - जालना

आलटून पालटून एकेकाला आमदार बनवणारा मतदार संघ म्हणून जालना विधानसभा मतदार संघाची ख्याती आहे. गेल्या २५ वर्षांपासून या मतदार संघात एकदा शिवसेना आणि एकदा काँग्रेसचा आमदार निवडून येण्याची जशी काही प्रथाच पडलीय. त्यामुळे या मतदार संघातून यंदा कोण बाजी मारणार हा औत्सुक्याचा विषय बनलाय.

Oct 8, 2014, 03:04 PM IST

मूठभर लोकांसाठी अच्छे दिन - शरद पवार

 मूठभर लोकांसाठी अच्छे दिन आहेत. राज्यात शिवसेना-भाजप युती तर काँग्रेस - राष्ट्रवादी यांची आघाडी तुटली. त्यामुळे प्रत्येक पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात असतील. उमेदवारांचे पिक आलेय. तुमच्यासाठी चांगले दिवस आहेत. तुम्ही चांगले पिक (उमेदवार) आहे ते ठेवायचे आणि बाकीचे (पसंत नसतील ते उमेदवार) तन उपटून टाका, असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मतदारांना दिला. जालन्यात आज जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते.

Sep 26, 2014, 03:23 PM IST

अवकाळी पावसानं राज्यात घेतले पाच बळी

सलग दुसर्‍या दिवशीही बीड, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात बर्‍याच ठिकाणी वादळीवार्‍यासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटही झाली. कोल्हापूर, सातारा आणि हिंगोलीत पावसानं पाच बळी गेले. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्याला गारपिटीचा चांगलाच तडाखा बसला.

Apr 20, 2014, 03:41 PM IST