पृथ्वीराज चव्हाण

अरे हे काय? आता राणेंनी केली मुख्यमंत्र्यांची स्तुती!

कोल्हापुरात आज अखिल भारतीय मराठा महासंघाचं राष्ट्रीय अधिवेशन झालं. य़ा अधिवेशनात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उद्योगमंत्री नारायण राणे आणि विरोधीपक्ष नेते विनोद तावडे उपस्थित होते. नारायण राणे गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत आहेत. मात्र आज हे दोन नेते शेजारी शेजारी बसले होते. या कार्यक्रमात नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांची स्तुती केली. 

Aug 3, 2014, 10:00 PM IST

10 वर्ष राष्ट्रवादीनं सत्ता भोगली तेव्हा दोष सापडले नाहीत- मुख्यमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेससोबत इतकी वर्षे सत्ता भोगली तेव्हा त्यांना दोष सापडले नाहीत. मात्र, लोकसभेचे निकाल धक्कादायक लागताच आता प्रत्येकाला शहाणपण सुचू लागलं आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डी. पी. त्रिपाठी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. 

Aug 3, 2014, 04:13 PM IST

'नरेंद्र' मोदी म्हणजे 'मौनेंद्र' - पृथ्वीराज चव्हाण

निवडणुकीआधी बोलणारे नरेंद्र मोदी आता शांत का झाले आहेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मौनेंद्र मोदी झाले आहेत, अशी टीका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी पहिल्यांदाच टीकेची तोफ डागली आहे.

Jul 29, 2014, 08:54 PM IST

आठवडा उलटला, राणेंच्या राजीनाम्याचं काय?

मंत्री पदाचा राजीनामा देउन एक आठवडा उलटला तरी काँग्रेसनं नारायण राणे यांच्या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. 

Jul 28, 2014, 02:00 PM IST

राष्ट्रवादीची 144 जागांची मागणी काँग्रेसनं धुडकावली

जागावाटपावरुन काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जाहीर शाब्दीक चकमक सुरू असताना याच मुद्द्यावरुन दोन्ही पक्षाच्या समन्वय समितीची बैठक काल रात्री उशीरा मुंबईत पार पडली. 

Jul 24, 2014, 10:10 AM IST

मुख्यमंत्री आणि राणेंची आज भेट होण्याची शक्यता

मुख्यमंत्री आणि काँग्रेस हायकमांडकडून राणेंचं मन वळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि नारायण राणे यांची भेट होण्याची शक्यता आहे.

Jul 22, 2014, 09:51 AM IST

मुख्यमंत्र्यांकडून 'फाम' घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश

फाम हौसिंग सोसायटी घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी अखेर चौकशीचे आदेश दिलेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी चौकशीचे आदेश दिले असून झी मिडियानं हा घोटाळा उघडकीस आणला होता. 

Jul 20, 2014, 03:31 PM IST