सरकार झालं उदार, पेट्रोल २ रुपयांनी स्वस्त!
देशभरात पेट्रोल दर वाढीला तीव्र विरोध झाल्यानंतर आता युपीए सरकारने पेट्रोलचे दर 2 रुपयांनी कमी केले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल.
Jun 2, 2012, 08:03 PM ISTदेशभरात पेट्रोल दरवाढीचा निषेध...
देशभरात पेट्रोल दरवाढीमुळे संताप उसळलाय. याच संतापामुळे एनडीएनं पुकारलेल्या आजच्या एका दिवसाच्या भारत बंदला भारतात काही ठिकाणी सौम्य तर काही ठिकाणी तीव्र प्रतिसाद पाहायला मिळतोय. पाहुयात, पेट्रोल दरवाढीवरून देशभरात कसा निषेध केला गेला केंद्र सरकारचा...
May 31, 2012, 02:57 PM ISTमहाराष्ट्रात बंदला हिंसक वळण
पेट्रोल दरवाढीविरोधात आज पुकारलेल्या भारत बंदमुळे राज्यातल्या जनजीवनावर परिणाम रात्रीपासूनच जाणवू लागलाय. पाहुयात आज सकाळपासून कुठे कुठे काय काय घडलं... भारत बंदला कसा मिळाला महाराष्ट्रात प्रतिसाद...
May 31, 2012, 02:56 PM ISTयूपीएला पेट्रोलची झळ
पेट्रोल दरवाढीवरुन केंद्र सरकारच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे. तृणमूल काँग्रेसने विरोध दर्शवल्यानंतर डीएमकेही रस्त्यावर उतरलं. मित्र पक्षांसोबत मनमोहन सिंगाच्या मंत्री मंडळातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्य़ांनीही पेट्रोलच्या दरवाढीचा विरोध केलाय.
May 30, 2012, 11:48 PM ISTहायकोर्ट सामान्यांच्या मदतीला...
महागाईत होरपळणा-या सामान्यांच्या मदतीला आता मुंबई हायकोर्ट सरसावलंय. पेट्रोल दरवाढीवर मुंबई हायकोर्टाने सरकारकडे स्पष्टीकरण मागितलंय.
May 30, 2012, 04:04 PM ISTभारत बंद : नुकसान केल्यास दंड
एनडीएने पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ उद्या ३१ मे रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे., या बंद दरम्यान काही नुकसान झाल्यास बंदकर्त्या संघटना आणि राजकीय पक्षांकडून दंडाच्या रूपाने होणाऱ्या नुकसानीची वसुली केली जाणार आहे.
May 30, 2012, 02:59 PM ISTउद्या 'भारत बंद', पेट्रोल दरवाढीचा निषेध
पेट्रोल दरवाढीचा भडका देशभर उडाला आहे. उद्या NDAनं भारत बंदची हाक दिली आहे. तर CNGच्या मुद्यावर दिल्लीत रिक्षाचालकांनी संपाचा इशारा दिला आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाच्या किंमती घटल्यानं पेट्रोल १.६७ पैशांनी कमी होण्याचे संकेत HPCL नं दिले.
May 30, 2012, 01:48 PM ISTपेट्रोल दरवाढ : देशभरात विरोध वाढतोय
देशभरात पेट्रोल दर वाढीला तीव्र विरोध होत आहे. करूणानिधी, ममता बॅनर्जीं यांनी कडाडून विरोध केला. तर गोव्यात मनोहर पर्रीकर यांचं सरकार आल्यावर पेट्रोलच्या किमती तब्बल ११ रुपयांनी कमी करण्यात आल्या.गोवेकरांनी हा आनंद एक महिनाही उपभोगला नाही तोवर केंद्र सरकारनं पेट्रोलच्या किमतीत मोठी वाढ करून आम जनतेला धक्का दिलाय.त्यामुळे देशासोबतच गोव्यातही या पेट्रोल दरवाढीचा तीव्र विरोध होत आहे.
May 29, 2012, 08:58 AM ISTममता, हवं तर पाठिंबा काढा - काँग्रेस
केंद्रातील युपीए सरकारला नेहमीच कोंडीत पकडणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांना पेट्रोलदरवाढीवरून हव तर पाठिंबा काढा, असा सल्ला दिला आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर मागे घेण्याचा प्रस्ताव बासनात गुंडाळण्यात येण्याचे स्पष्ट झाले आहे.
May 26, 2012, 08:28 PM ISTदिल्लीत पेट्रोल होणार स्वस्त, महाराष्ट्राचं काय?
उत्तराखंड, केरळपाठोपाठ आता दिल्लीतही पेट्रोल स्वस्त होणार आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी पेट्रोलच्या करात कपात करण्याचे संकेत दिलेत. इतर राज्यांना जे जमतं ते महाराष्ट्राला का नाही, असा प्रश्न आता विचारला जातोय.
May 25, 2012, 04:45 PM ISTमंत्र्यांची इंधनावर उधळपट्टी
केंद्रीय कॅबिनेट मंत्री तसंच राज्य मंत्र्यांनी गेल्या दोन वर्षात पेट्रोल आणि डिझेलवर तब्बल 3 कोटी 67 लाख रूपये उधळले आहेत.पेट्रोल दरवाढीचा भडका उडालाय. मात्र दुस-या बाजुला जनतेचे सेवक म्हणवणारे लोकप्रतिनिधी मात्र पेट्रोल, डिझेलवर करोडो रूपये उधळत आहेत.
May 25, 2012, 12:28 PM IST‘काँग्रेस सरकार हाय-हाय’
एक नजर टाकुयात मुंबई, डोंबिवली, शिर्डी आणि सोलापूरात आज वेगवेगळ्या पक्षांकडून करण्यात आलेल्या आंदोलनांवर. विशेष म्हणजे या आंदोलनात ला सामान्यांचा सहभागही उल्लेखनीय होता.
May 24, 2012, 04:56 PM ISTउत्तराखंडात 'सेस' हटला; महाराष्ट्रात 'व्हॅट'चं काय?
उत्तराखंड सरकारनं मात्र या महागाईपासून आपल्या नागरिकांचा बचाव करण्यासाठी पेट्रोलवाढीवरचा सेस हटवण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्र सरकारही महागाईनं होरपळणाऱ्या सामान्यांना दिलासा देईल का?
May 24, 2012, 01:47 PM ISTकेंद्र सरकार धास्तावलं...
पेट्रोल दरवाढीच्या विरोधात देशभर तीव्र संताप निर्माण झालाय. सराकरनंही या संतापामुळं धास्तावलंय.
May 24, 2012, 01:45 PM ISTपेट्रोल भडकलं... राज्यभर पसरलं...
पेट्रोल दरवाढ... महागाई... आणि त्यात होरपळणारी त्रस्त जनता...
मुंबई - गोवा महामार्ग, नागपूर, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली... आता आणखी कुठे व्हायचं बाकी आहे आंदोलन... जनतेच्या संतापाचा तीव्र उद्रेक...