मध्य रेल्वे

फुकट्या प्रवाशांना मध्य रेल्वेचा दणका

लोकलने विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांना मध्य रेल्वेने चांगलाच दणका दिला आहे. या चालू वर्षात म्हणजेच जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान मध्य रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून तब्बल ३९ कोटी ७५ लाख ३३ हजार ७७८ इतका दंड वसूल केला आहे. शिवाय, विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेने चालू वर्षात ८ लाख २३ हजार ८०६ गुन्ह्यांची नोंदही केली आहे.

Nov 4, 2017, 09:50 PM IST

रेल्वेत २१९६ पदांसाठी भरती, महाराष्ट्रातील तरुणांसाठी नोकरीची संधी

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, भारतीय रेल्वेमध्ये तब्बल २१९६ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

Nov 4, 2017, 03:36 PM IST

माथेरानची राणी अखेर रुळावर

गेल्या दीड वर्षापासून यार्डात असलेली माथेरानची राणी रविवारी अखेर रुळावर आलीये. माथेरानची राणी अर्थात मिनीट्रेनची रविवारी चाचणी घेण्यात आली.

Oct 29, 2017, 09:21 PM IST

मुंबई : मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या दुरूस्ती आणि देखभालीसाठी मध्य रेल्वे मार्गावरील मेन लाईन आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना मात्र आनंदाची बातमी असून, या मार्गावर कोणत्याही प्रकारचा मेगाब्लॉक असणार नाही.

Oct 29, 2017, 08:29 AM IST

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी

मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सेंट्रल लाईनवरील प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने आपल्या गाड्यांच्या १८ फेऱ्या वाढण्याचा निर्णय घेतला आहे.

Oct 26, 2017, 08:13 PM IST

मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक, हार्बर, ट्रान्स हार्बर नियमित

रविवारच्य सुट्टीचे प्लॉनिंग करून घराबाहेर पडणाऱ्या मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील प्रवाशांना मेगाब्लॉकचा अडथळा येणार आहे. तर, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द झाल्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.

Oct 22, 2017, 08:51 AM IST

मध्य रेल्वे विस्कळीत, भाऊबीजेला प्रवाशांना मनस्ताप

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेय. त्यामुळे २० ते २५ मिनिटांनी गाड्या उशिराने धावत आहेत. याचा फटका प्रवाशांना ऐन भाऊबीजेच्या दिवशी बसत आहे.

Oct 21, 2017, 11:38 AM IST

एका बॅनरने मध्य रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर तुटली..

आधीच अनेक समस्यांच शुक्लकाष्ठ मागे लागलेल्या मरेला कोलमडायला काल विचित्र कारण कारणीभूत ठरले. जोरदार वाऱ्याने उडालेला एक बॅनर रेल्वे मार्गावरून वेगाने जात असलेल्या दुरंतो एक्स्प्रेसच्या पेंटग्राफमध्ये जाऊन अडकला. त्यामुळे ओव्हरहेड वायर तुटली.

Oct 17, 2017, 09:12 AM IST

कसारा-उंबरमाळी दरम्यान मेल इंजिनात बिघाड, मध्य रेल्वे विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. कसारा-उंबरमाळी स्टेशनदरम्यान पंजाब मेलच्या इंजिनात बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Oct 11, 2017, 10:15 AM IST

मध्य रेल्वेवर १ नोव्हेंबरपासून १६ वाढीव फेऱ्या

 पश्चिम रेल्वे, हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर गेल्या महिन्यात जादा फेऱ्या सुरू झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर १ नोव्हेंबरपासून गर्दीच्या वेळेत १६ वाढीव फेऱ्या सुरू होणार आहेत. या सर्व लोकल ठाण्यापुढील प्रवाशांसाठी आहेत.

Oct 11, 2017, 09:46 AM IST

रविवारी मध्य - हार्बर रेल्वेचा मेगाब्लॉक

रविवारी ८ ऑक्टोबर, २०१७ रोजी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असेल... त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनानं सूचना जारी केलीय.

Oct 6, 2017, 11:00 PM IST