पाणी ओसरतेय, मुंबई हळूहळू पूर्वपदावर
काल अतिवृष्टीमुळे ठप्प झालेले मुंबई आज पूर्वपदावर येताना दिसत आहेत. सखल भागात साचलेले पाणी ओसर आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक सुरु झालेय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन रेल्वे कल्याणकडे रवाना होत आहेत. लोकल सेवा धिम्यागतीने सुरु आहे.
Aug 30, 2017, 09:10 AM ISTमध्य रेल्वे सुरु, दोन लोकल कल्याणच्या दिशेने रवाना
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन पहिली रेल्वे कल्याणकडे रवाना झाली. दरम्यान भायकळा येथे लोकल १० मिनिटे रखडली होती. ती आता पुढे रवाना झालेय. त्यानंतर दुसरी लोकलही सोडण्यात आली. त्यामुळे मध्य रेल्वे आता हळहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे रखडेल्या प्रवाशांना मोठा दिसाला मिळालाय.
Aug 30, 2017, 08:31 AM ISTमुंबई-कोकणवर असलेले ढगाचे अच्छादन उत्तरेला, पावसाचा जोर ओसणार !
सकाळी सकाळी मुंबई आणि परिसराला दिलासा देणारी बातमी. उपग्रहानं दिलेल्या ताज्या छायाचित्रांनुसार मुंबई आणि उत्तर कोकणावर असलेलं ढगाचं अच्छादन आणखी उत्तरेला सरकले आहे. त्यामुळे आज मुंबईतला पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
Aug 30, 2017, 07:36 AM ISTमध्य, हार्बर रेल्वेची वाहतूक अजूनही ठप्पच
गेल्या १८ तासापासून मुंबईकरांची पाऊस कोंडी अजूनही सुटलेली नाही. रात्रभरात पावसाचा जोर ओसरला असला तरी मुंबईची लाईफलाईन मात्र अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. मध्य आणि हार्बरची वाहतूक अजूनही ठप्पच आहे.
Aug 30, 2017, 07:21 AM ISTमध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक
मध्य रेल्वे तसेच हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेमार्गावर मात्र आज मेगाब्लॉक नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. 3
Aug 13, 2017, 11:34 AM ISTमध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक आहे. तर पश्चिम मार्गावर नाईट ब्लॉक असणार आहे.
Jul 30, 2017, 09:00 AM ISTनेरूळ- उरण रेल्वेमार्गाचे काम युद्धपातळीवर, डिसेंबर अखेर धावणार रेल्वे?
सिडको आणि सेंट्रल रेल्वे तर्फे नेरूळ- उरण रेल्वेमार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. एकूण २७ किलोमीटर लांबीच्या मार्गापैकी नेरूळ- खारकोपर या ८ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे काम सध्या सुरू आहे. डिसेम्बर २०१७ पर्यंत खारकोपर पर्यंत चा रेल्वे मार्ग सुरूर करण्यात येणार आहे. हा मार्ग वेळेत सुरू झाल्यास उलवे परिसरात मोठ्या प्रमाणात राहणाऱ्या चाकरमान्यांसाठी मुंबई चा प्रवास सुखकर ठरणार आहे.
Jul 18, 2017, 10:33 PM ISTमध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात आलाय. मध्य रेल्वेच्या कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान जलद मार्गावर तर हार्बर मार्गाच्या कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Jul 9, 2017, 08:27 AM ISTमध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत, गाड्या उशिराने
कल्याण स्थानकाजवळ मंगला एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे या मार्गावरील गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या.
Jun 30, 2017, 06:07 PM ISTकॉलेज तरुण दादर येथे ओव्हरहेड वायरला चिकटला, मध्य रेल्वे विस्कळीत
मध्य रेल्वे मार्गावर दादर येथे ओव्हरहेड वायरला एक कॉलेज तरुण चिकटल्याने वाहतूक ठप्प पडली.
Jun 28, 2017, 04:08 PM ISTमुंबईकरांनो, रविवारी आहे मध्यरेल्वेवर मेगाब्लॉक!
मध्य रेल्वेवर उद्या दोन विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील सेवा किमान सहा तासांसाठी बंद असतील.
Jun 24, 2017, 02:49 PM ISTमध्य रेल्वेची प्रवाशांसाठी गुडन्यूज, ४० फेऱ्या वाढणार
मध्य रेल्वेने प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. मध्य रेल्वेवर ऑक्टोबरमध्ये लागू होणाऱ्या नवीन वेळापत्रकात लोकल फेऱ्यांमध्ये काही प्रमाणात बदल केले जाणार आहे. त्यानुसार ४० अधिकच्या फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
Jun 21, 2017, 04:02 PM ISTमध्य रेल्वेवर मुलुंड-माटुंगा स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या मुलुंड-माटुंगा स्थानकांदरम्यान सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० पर्यंत दुरुस्तीची कामं केली जाणारयत. त्यामुळे या मार्गावरच्या लोकल अप जलद मार्गावरून चालवण्यात येतील.
Jun 11, 2017, 08:37 AM IST...या रेल्वे स्टेशनवर असतील केवळ महिला कर्मचारी!
आता भारतात असंही एक रेल्वे स्टेशन असेल जिथे केवळ महिलांचंच राज्य असेल... होय, आणि हे स्टेशन देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतल्या मध्य रेल्वे मार्गावरच एक स्टेशन आहे.
Jun 2, 2017, 11:18 AM IST