मुंबई : आता भारतात असंही एक रेल्वे स्टेशन असेल जिथे केवळ महिलांचंच राज्य असेल... होय, आणि हे स्टेशन देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतल्या मध्य रेल्वे मार्गावरच एक स्टेशन आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा रोड हे स्टेशन लवकरच एक इतिहास रचणार आहे. जवळपास एका आठवड्याभरात हे रेल्वे स्टेशन महिला कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिलं जाणार आहे. हे देशातील पहिलंच स्टेशन असेल जिथल्या सर्व कर्माचारी केवळ महिलाच असतील.
माटुंग स्टेशनवर जवळपास ३० महिलांचा स्टाफ आहे. यातील ११ बुकींगसाठी, ७ तिकीट कलेक्टर्स, २ चीफ बुकींग सल्लागार आणि इतर कर्मचारी आहेत.
महिला सशक्तिकरणाला यामुळे मदत मिळेल, अशी आशा रेल्वे प्रशासनाला आहे. यापूर्वी, जयपूरचं मेट्रो स्टेशन महिलांद्वारे संचालित केलं जातंय.