महाड दुर्घटना

ही आहेत महाड दुर्घटनेतील १४ मृत व्यक्तींची नावे

महाड येथे झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत २० जणांचे मृतदेह हाती लागलेत. त्यापैकी गुरुवारी संध्याकाळपर्यंत सापडलेल्या १४ मृतदेहांची ओळख पटलीये. महाड अपघातात आजपर्यंत एकूण ४२ बेपत्ता प्रवाशांची नोंद त्यांच्या नातेवाईकांनी प्रशासनाकडे केली आहे

Aug 5, 2016, 11:02 AM IST

'तो' लहानगा पाहतोय पप्पांची वाट

मुंबईला आलेल्या आईला गावाला सोडून अविनाश मालप हे मुंबईला परतत होते. ते जयगड-मुंबई एसटीने मुंबईला परतत होते. मात्र हा प्रवास त्यांचा अखेरचा प्रवास ठरला. असे काही घडेल यांची त्यांना किंवा त्यांच्या कुटुबियांना थोडीही कल्पना नव्हती. 

Aug 5, 2016, 10:45 AM IST

महाड पूल दुर्घटनेत ४२ जण बेपत्ता, १२ मृतदेह सापडलेत

महाड दुर्घटनेत एकूण ४२ जण बेपत्ता आहेत. यापैकी १२ मृतदेह हाती सापडलेत आहेत. दुसऱ्या दिवशी हे मृतदेह सापडलेत. 

Aug 4, 2016, 09:21 PM IST

महाडच्या दुर्घटनेनंतर मुंबईतले ५ जण बेपत्ता

महाडच्या सावित्री नदीच्या दुर्घटनेनंतर नालासोपाऱ्यातले ५ जण बेपत्ता असल्याची माहिती पुढे येत आहे. नालासोपारा पश्चिम येथे राहणारे समीर बलेकर, त्यांच्या दोन बहिणी आणि त्यांचे पती असे ५ जण बेपत्ता आहेत. 

Aug 4, 2016, 08:14 PM IST

महाड पूल दुर्घटना : एसटीतील मृतांच्या नातेवाईकांना १० लाख, वारसाला नोकरी

रायगड जिल्ह्यातील महाड-पोलादपूर पूल दुर्घटनेत अनेकांना जीव गमवावा लागला. दोन्ही एसटीतील २२ प्रवासी बेपत्ता आहेत. यापैकी काहींची मृतदेह हाती लागलेत. एसटीतील मृत प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत किंवा वारसाला सरकारी नोकरी देण्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे.

Aug 4, 2016, 08:12 PM IST

महाड पूल दुर्घटना : सावित्री नदीत दोन एसटीसह ७ खासगी वाहने गेली वाहून

मुंबई गोवा महामार्गावरील महाडजवळील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पूल वाहून गेल्याने झालेल्या दुर्घटनेत २२ पेक्षा जास्त लोक गायब असल्याचे वृत्त आहे. याच नदीत एसटी महामंडळाच्या दोन बसेस आणि सात खासगी वाहनं वाहून गेली आहेत.

Aug 4, 2016, 07:00 PM IST

महाड पूर दुर्घटना : राज ठाकरे यांची जहाल प्रतिक्रीया

महाडाच्या दुघर्टनेवरून सरकारवर कोरडे ओढाणाऱ्यांच्या यादीत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचंही नाव सामील झालंय. आपल्या सरकार पेक्षा ब्रिटीशांना आपली जास्त काळजी होती असा घणाघात आज राज ठाकरेंनी नाशिकमध्ये केला आहे.

Aug 4, 2016, 06:43 PM IST

महाड पूल दुर्घटना : आतापर्यंत ७ मृतदेह बाहेर काढण्यात यश

रायगड जिल्ह्यातीली महाड दुर्घटनेतील ७ मृतदेह आतापर्यंत सापडले असून ५ जणांची ओळख पटली आहे . 

Aug 4, 2016, 05:15 PM IST

महाड दुर्घटनेतील मृतदेह समुद्रात गेले वाहून ?

महाड दुर्घटनेत सावित्री नदीमध्ये वाहून गेलेल्या वाहनांमधील मृतदेहांपैकी तीन मृतदेह सापडले असून, तीनही मृतदेह समुद्र किना-यावर सापडले आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हे मृतदेह अरबी समुद्रात वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहेत.

Aug 4, 2016, 12:18 PM IST

महाड दुर्घटनेतील तीन मृतदेह हाती; तपासाची कक्षा वाढवण्याची आवश्यकता

महाड दुर्घटनेनंतर आता जवळपास ३३ तास उलटून गेलेत. आत्तापर्यंत समुद्रकिनाऱ्याजवळच्या स्थानिकांच्या मदतीनं दोन मृतदेह हाती लागलेत. 

Aug 4, 2016, 09:44 AM IST

महाड : सापडलेले दोन मृतदेह वेगळ्याच दुर्घटनेतले

महाड दुर्घटनेला १९ तास उलटल्यानंतरही बचावकार्याला अद्याप यश आलेलं नाही. सापडलेले दोन मृतदेह वेगळ्याच दुर्घटनेतले असल्याचं आता समोर येतंय. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती चुकीची असल्यानं नातलगांमध्ये संतापाचं वातारवण आहे. 

Aug 3, 2016, 06:20 PM IST