मायावती

यूपी भाजप उपाध्यक्षाकडून मायावतींची तुलना वेश्यांशी

भाजपचे उत्तर प्रदेशातील उपाध्यक्ष दयाशंकर सिंह यांनी अतिशय खालच्या स्तराचं वक्तव्य केलं आहे. बसप अध्यक्षा मायावती यांची  तुलना त्यांनी वेश्यासोबत केली आहे, यामुळे एक नवा वाद निर्माण झाला आहे.

Jul 20, 2016, 05:29 PM IST

मायावतींकडून 'आरएसएस'ला 10 लाख रुपयांचं दान!

लखनऊस्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून बनवण्यात आलेल्या माधव सेवा आश्रमावर केवळ भाजपच नाही तर बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावतींचीही मेहरनजर असल्याचं समोर आलंय. 

Mar 31, 2016, 02:57 PM IST

निलंबन कारवाई : काँग्रेसला मुलायम, मायावतींची साथ

गेल्या काही दिवसांपासून एकट्या पडत चाललेल्या काँग्रेसला आज मात्र 9 पक्षांची साथ मिळालीय. काँग्रेसच्या खासादारांच्या निलंबनाविरोधात सुरू असलेल्या आंदोलानात मुलायम मायावतीही सहभागी झाले आहेत. दरम्यान, मुंबईत हुतात्मा चौकात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलीय. खासदारांच्या निलंबनाविरोधात मुंबईत निदर्शनं केली. 

Aug 4, 2015, 05:40 PM IST

राष्ट्रवादीची ‘टिकटिक’ केवळ महाराष्ट्रातच वाजणार!

राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळं शरद पवारांच्या घड्याळाची टिकटिक केवळ राज्यापूरतीच राहू शकते.

Jun 30, 2014, 02:09 PM IST

माजी मुख्यमंत्री मायावती थोडक्यात बचावल्या

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती थोडक्यात बचावल्या आहेत, लखनौत विमान उतरविण्यात येत होते, यावेळी तांत्रिक बिघाड झाला मात्र सुदैवाने अपघात टळला.

Apr 14, 2014, 06:25 PM IST

महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बनवून दाखवेन- मायावती

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपा प्रमुख मायावती यांनी आज नागपूरमध्ये सभा घेतली. यावेळी भाषणामध्ये महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बनवून दाखवेन, अशी ग्वाही दिली. महाराष्ट्राचा विकास करून त्याचं उत्तर प्रदेश बनवायचं असेल, तर आम्हाला सत्ता द्या. असं या वेळी मायावती म्हणाल्या.

Feb 17, 2013, 04:15 PM IST

पूर्ण विचारानंतरच घेणार यूपीए समर्थनाबद्दल निर्णय - मायावती

‘यूपीए’ समर्थन द्यायचं की नाही याबद्दल निर्णय घेण्याची जबाबदारी पक्षानं सर्वस्वी माझ्यावर सोपवलीय... पूर्ण विचाराअंतीच मी याबद्दल निर्णय घेईन’ असं बसपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर मायावतींनी स्पष्ट केलंय.

Oct 10, 2012, 12:17 PM IST

मायावतींच्या चौपट अखिलेश यादवचा पार्क

मायावतींना बनवलेल्या पार्कमधील मोकळ्या जागेत हॉस्पिटल बनवण्याचं अश्वासन देणारे समाजवादी पार्टीचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आता समाजवादी पार्टीचे नेते जनेश्वर मिश्रा यांच्या नावाने पार्क बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

Aug 8, 2012, 05:12 AM IST

माझ्या जीवाला धोका - मायावती

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी माझ्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी जास्त सुरक्षा व्यवस्थेची मागणी केली आहे. याबातचे पत्र पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना लिहिले आहे.

May 2, 2012, 02:26 PM IST

युपीएच्या मानगुटीवर युपीचं भूत..

भलतचं धाडस राहुलबाबांच्या अंगाशी आलं आणि युपीत काँग्रेसला तोंडघशी पडावं लागलं. गरिबांचा कळवळा असल्याचं दाखवणा-या राहुलबाबांना युपीतल्या जनतेनं नाकारलं उलटं टॅब्लेटची स्वप्न दाखवणा-या आणि शेतक-यांना सोबत घेणारा अखिलेश त्यांना जवळचा वाटला. पण अपयशाची जबाबदारी स्विकारणा-या राहुल बाबांचा उदोउदो करणा-यांना वेळीच लगाम घालून चुकांमधून शिकणं काँग्रेससाठी अत्यावश्यक आहे नाहीतर मग युपी पॅटर्नची पुनरावृत्ती होणार आहे.

Mar 7, 2012, 10:31 PM IST

का अटली मतदारांची 'माया'?

‘बहुजन समाज पार्टी’च्या शासनकाळात उत्तर प्रदेशातल्या दलितांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली असली तरी मायावती मुसलमान आणि इतर समाजामध्ये विश्वास निर्माण करु शकल्या नाहीत.

Mar 7, 2012, 10:59 AM IST

यूपी निकालांपूर्वी राजकीय हालचालींना वेग

मतमोजणीच्या आदल्या दिवशी देशाचं लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेशात निकालानंतरच्या संभाव्य आघाड्यांसाठीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत

Mar 5, 2012, 02:39 PM IST

हत्तींवर पडदा, दलित विरोधी!

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावतींनी निवडणूक आयोगाच्या पुतळे झाकण्याच्या आदेशावर नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाची कारवाई सरकारच्या दबावाखाली असून हा आदेश म्हणजे दलित विरोधी मोहीम असल्याचं मायावतींनी म्हटलं आहे.

Jan 16, 2012, 09:18 AM IST