www.24taas.com, लखनऊ
मतमोजणीच्या आदल्या दिवशी देशाचं लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेशात निकालानंतरच्या संभाव्य आघाड्यांसाठीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या निकालांसदर्भात पाच न्युज चॅनल्सनी केलेल्या एक्झिट पोलमध्ये त्रिशंकु परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एक्झिट पोलनुसार बसप,काँग्रेस,भाजप आणि सप या पक्षांच्या चौरंगी लढतींमध्ये समाजवादी पार्टी सर्वाधिक जागांवर विजय मिळवण्याची शक्यता आहे.
काँग्रेसने ही संधी न गमावता मायावतींच्या बसपाशी हातमिळवणीचे संकेत दिले आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते बेनी प्रसाद वर्मा४ यांनी काल मायावतींच्या बसपशी आघाडी करण्याबाबत सूतोवाच करत खळबळ उडवून दिली आहे. मुलायमसिंग यादव यांच्याशी मतभेद झाल्यानंतर २००७ साली बेनीप्रसाद वर्मांनी समाजवादी पक्षाला रामराम ठोकला होता.
बेनप्रसाद वर्मांनी समाजवादी पक्ष हा गुंडांचा पक्ष असून बसपशी आघाडी करण्याबाबत व्यक्तिगत पसंती दर्शवली आहे. काँग्रेसने हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर भाजपने बसपशी गुप्त बोलणी सुरु केली आहेत.