www.24taas.com, पणजी
गोवा विधानसभेच्या ४० जागांसाठी विक्रमी मतदान झालंय. सुमारे ८० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळापासून बहुतांश मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
२१५ उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएमध्ये बंद झालंय. मतदानासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या निवडणुकीत भाजप आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षानं युती केली असून सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे. याशिवाय तृणमूल काँग्रेस, युजीडीपी, गोवा विकास पार्टीसारखे १९ पक्ष रिंगणात आहेत.
सकाळीच विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी पणजीत मतदान केलं. यावेळी युतीची सत्ता येईल असा दावा त्यांनी केलाय.