मुंबई पाऊस

पावसात अडकलेल्यांना मुंबईकरांचा मदतीचा हात, तुम्ही येथे थांबा!

चार तासात अतिवृष्टी झाली आणि मुंबईची दैना उडाली. शहरातील रस्ते पाण्याखाली गेलेत. तसेच रेल्वे सेवा पावसामुळे ठप्प पडली आहे. त्यामुळे दळणवळाची साधन नसल्याने अनेक जणांना घरी जाता आलेले नाही. अशा पावसात अडकलेल्या लोकांना मुंबईकरांनी मदतीचा हात पुढे केलाय.

Aug 29, 2017, 08:42 PM IST

पुणे, नाशिकमधील वाहनांना मुंबईत नो एन्ट्री

पुणे, नाशिकमधून येणारी वाहनांना मुंबईत नो एन्ट्री, पावसामुळे मुंबईतील वाहतूक सेवेचा पुरता बोजवारा उडालाय, अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने मुंबईत पडलेला ताण अधिक वाढू नये म्हणून बाहेरुन येणाऱ्या गाड्यांना बंदी करण्यात आलेय.

Aug 29, 2017, 07:24 PM IST

पावसामुळे मुंबईतील शाळा, कॉलेजला उद्या सुटी जाहीर

जोरदार पावसामुळे मुंबईकरांचे हाल झाले आहेत. पाऊस न थांबल्याने पाणी साचल्याने वाहतूक सेवा ठप्प आहे. अनेक मार्गावर गाड्या खोळंबल्या आहेत. तसेच तिन्ही मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प आहे. त्यामुळे अनेक जण अडकलेत. अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून उद्या शाळा, कॉलेजला सुटी जाहीर करण्यात आली आहे.

Aug 29, 2017, 06:59 PM IST

मुंबईकरांचे हाल : पावसामुळे वाहतूक सेवा ठप्प, अनेक जण अडकलेत

 मुसळधार पावसामुळ मुंबईकरांचे हाल, अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक ठप्प, घरी  जाणाऱ्यांचे हाल झालेत. कोणतेही वाहन नसल्याने घरी कसे पोहोयचे असा प्रश्न त्यांना सतावतोय.

Aug 29, 2017, 06:41 PM IST

मुसळधार पावसाने मुंबई पाण्याखाली, बघा फोटो

मुंबईत मुसळधार पावसामुळे मुंबई पाण्याखाली गेली असून अनेक ठिकाणी पाणी शिरलं आहे. रेल्वे सेवा, बस सेवा, विमान सेवा यामुळे बंद पडली आहे. तर भारतीय हवामान खात्याने दुपारी १.०० वाजता दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील ४ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, अलिबाग, डहाणू व भोवतालच्या परिसरात अतिवृष्टी होणार आहे. त्याच बरोबर पुढील ४८ तासात उत्तर मध्य महाराष्ट्र व उत्तर कोकणासाठी अतिवृष्टीचा हवामान खात्याने इशारा दिलेला आहे. दिवसभर झालेल्या पावसाने मुंबईचे काय हाल झालेत ते या फोटोंमधून बघा...

Aug 29, 2017, 06:33 PM IST

मुसळधार पाऊस, गरज असेल तर बाहेर पडा : मुंबई पालिका

शहरात जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे अति महत्वाचे काम असल्‍याच घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

Aug 29, 2017, 03:49 PM IST

मुंबई आणि उपनगरात रात्रभर पावसाची संततधार

राज्यात वरुणराजानं दमदार कमबॅक केले आहे. राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस होतोय. मुंबई आणि मुंबई उपनगरात रात्रभर पावसाची संततधार सुरु होती. विश्रांतीनंतर सकाळी काही वेळ पुन्हा पावसाला सुरुवात झाली.

Jul 15, 2017, 11:28 AM IST