मुसळधार पाऊस

मुंबईत रेकॉर्ड ब्रेक ४१६.६ मिमीहून अधिक पावसाची नोंद

मंगळवारी झालेल्या जोरदार वा-यासह आलेल्या पावसाने मुंबईला झोडपून काढले. बुधवारी सकाळी पावसाचा जोर जरा कमी झाल्याचे दिसत आहे. मात्र, दिवसभर झालेल्या पावसाने अनेकांना २६ जुलैची आठवण करून दिली.

Aug 30, 2017, 07:53 AM IST

मुसळधार पावसाने मुंबई पाण्याखाली, बघा फोटो

मुंबईत मुसळधार पावसामुळे मुंबई पाण्याखाली गेली असून अनेक ठिकाणी पाणी शिरलं आहे. रेल्वे सेवा, बस सेवा, विमान सेवा यामुळे बंद पडली आहे. तर भारतीय हवामान खात्याने दुपारी १.०० वाजता दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील ४ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, अलिबाग, डहाणू व भोवतालच्या परिसरात अतिवृष्टी होणार आहे. त्याच बरोबर पुढील ४८ तासात उत्तर मध्य महाराष्ट्र व उत्तर कोकणासाठी अतिवृष्टीचा हवामान खात्याने इशारा दिलेला आहे. दिवसभर झालेल्या पावसाने मुंबईचे काय हाल झालेत ते या फोटोंमधून बघा...

Aug 29, 2017, 06:33 PM IST

मुसळधार पावसामुळे मुंबई पाण्यात

गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बेहाल झालेल्या मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्रीपासूनच पावसाने जोर धरल्याने मुंबईच्या अनेक भागात पाणी साचले असून मुंबईच्या लाईफलाईनची सेवाही विस्कळीत झाली आहे.  

Aug 29, 2017, 01:20 PM IST