तटकरे-जाधव वाद केवळ चार भिंतीत मिटला, रत्नागिरीत वाद कायम
कोकणातील राष्ट्रवादीच्या दोन मात्तबर नेत्यांमधला वाद राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी मिटवला खरा. पण या दोन नेत्यांच्या वादात ज्या कार्यकर्त्यांनी उड्या घेतल्या त्यांच्यातील वाद मात्र अजून मिटलेला दिसत नाहीय.
Jan 17, 2014, 07:57 AM ISTमार्लेश्वर -गिरीजा देवी...लग्न सोहळा याची देही याची डोळा
रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर देवाचा कल्याणविधी अर्थात विवाह सोहळा संपन्न झाला.
Jan 15, 2014, 11:33 AM ISTहप्ता मागणाऱ्या गुंडाना चोप, एकाचा मृत्यू
रत्नागिरीतल्या खाऊ गल्लीत विक्रेत्यांकडे हप्ता मागायला गेलेल्या दोन गुंडांना विक्रेत्यांनी चोप दिलेला वासीन मोमीन उर्फ उंड्याचा मृत्यू झालाय... .
Jan 10, 2014, 01:53 PM ISTरत्नागिरीत गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार
रत्नागिरी तालुक्यात एक धक्कादायक आणि चिड आणणारी घटना घडली. शाळेतून घरी परतणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या पिडीत मुलीला मित्राच्या घरी नेऊन गुंगीचे औषध दिले. त्यानंतर त्यांनी वाईट कृत्य केलं.
Jan 9, 2014, 05:14 PM ISTराज्यातील काही घडामोडी संक्षिप्त...
राज्यातील काही घडामोडींचा संक्षिप्त वेध...
Dec 28, 2013, 12:44 PM ISTथर्टी फर्स्टसाठी कोकणात पर्यटकांची गर्दी
थर्टी फर्स्टसाठी कोकणात पर्यटकांची गर्दी होवू लागलीय. कोकणातले समुद्रकिनारे सध्या गजबजलेत. पर्यटकांमुळे हॉटेलचे दरही दुप्पटीने वाढलेत. यंदा पर्यटकांची सर्वाधिक पसंती तारकर्ली बीचला. तसेच रत्नागिरीलाही पसंती आहे. गणपतीपुळे येथेही अशी परिस्थिती आहे.
Dec 26, 2013, 11:17 AM ISTपाणी मागण्याच्या बहाण्याने दापोलीत भरदिवसा दरोडा
रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा भरदिवसा दरोडा पडलाय. दापोली तालुक्यात पाणी मागण्याच्या बहाण्याने दरोडा टाकण्यात आला. याआधी रत्नागिरीतील जाकादेवी येथे बॅंकेवर दरोडा टाकण्यात आला होता. दरोड्याचे सत्र सुरू असल्याने रत्नागिरी जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. २० ते २५ वयोगटातील तरूणांनी हा दरोडा टाकला. दरोड्याच्यावेळी महिलेचे हात-पाय बांधून लाखाचा ऐवज लंपास करण्यात आलाय.
Dec 26, 2013, 08:14 AM ISTशाळेनेच केले जातीच्या आधारावर विद्यार्थ्याला बहिष्कृत
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधल्या एसव्हीपीएम शाळेत जातीच्या आधारावर विद्यार्थ्याला बहिष्कृत करण्याचा धक्कादायक प्रकार गेल्या सहा महिन्यांपासून सुरु आहे. या प्रकरणी शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात मुलाच्या पालकांनी आमरण उपोषण सुरु केलंय.
Dec 19, 2013, 09:55 PM ISTरत्नागिरीत आढळला दुर्मिळ जातीचा काळा बिबट्या
रत्नागिरी जिल्ह्यात तोरणा भाटी परिसरात अतिशय दुर्मिळ जातीचा काळा बिबट्या आढळला आहे. गावकऱ्यांना सकाळपासून बिबट्याच्या डरकाळ्या ऐकू येत होत्या, मात्र त्याचा मागमूस लागत नव्हता. अचानक काही गावक-यांना तो विहिरीत पडलेला दिसल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.
Dec 19, 2013, 06:43 PM ISTरत्नागिरीत बँक लूटली : बिल्डर निघाला दरोडेखोर
रत्नागिरीतील बँक दरोडा प्रकरणातील प्रमुख आरोपी हा एक व्यावसायिक बिल्डर असल्याचे पुढे आहे. त्याला पोलिसांनी डोंबिवलीचून अटक केली. हा बिल्डर करोडपती असूनही केवळ नाव कमावण्याच्या हौसेपोटी दरोड्याचा मार्ग अवलंबला असल्याचे पुढे आलेय. त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आलेय.
Dec 12, 2013, 01:54 PM ISTव्हील रॉड तुटला... रस्त्यावरच पलटली एसटी, ८ जखमी
रत्नागिरी पावसजवळच्या वायंगणीमध्ये एसटी बस पलटी झालीय. या गाडीमध्ये बहुतेक शाळकरी मुले होती. त्यातली काही किरकोळ जखमी आहेत. मात्र, ८ प्रवासी गंभीर आहेत.
Dec 2, 2013, 01:53 PM ISTरत्नागिरीत सेंट्रल बँकेवर दरोडा : १ ठार, ९.३०लाख लुटले
रत्नागिरीतल्या जाकादेवी गावातल्या सेंट्रल बँकेवर भर दिवसा धाडसी दरोडा टाकण्यात आलाय. पाच अज्ञान व्यक्ती आलीशान गाडीतून आले आणि बँकेचा लंच टाईम सुरु होण्याआधी जबरदस्तीने घुसले. यावेळी झालेल्या गोळीबारात बँकेच्या शिपायाचा जागीच मृत्यू झाला. तर बँकेतील आणखी एक शिपाई गंभीर जखमी झालाय. फिल्मिस्टाईलने बँक लुटत दरोडेखोरांनी बँकेतील ९ लाख ७० हजार रुपये पळवले.
Nov 29, 2013, 07:16 AM ISTनारायण राणेंची शिवसेनेवर जोरदार टीका
काँग्रेसचे नेते आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज रत्नागिरीत बोलताना शिवसेनेवर जोरदार टीका केली. रत्नागिरी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त करू, असे जाहीर आव्हान राणे यांनी दिले.
Nov 22, 2013, 05:28 PM ISTकुंभार्ली घाटात बसचा अपघात; तीन ठार
रत्नागिरीत मिनी बसला भीषण अपघात झालाय. रत्नागिरीतल्या कुंभार्ली घाटात ही मिनी बस कोसळली. यात बसमधील तीन जण ठार तर सात जण जखमी झालेत.
Nov 18, 2013, 07:51 AM ISTसावर्डे गावाला वादळाचा तडाखा, अनेकांचे संसार उघड्यावर
मुंबई-गोवा महामार्गावरच्या सावर्डे गावाला ऐन दिवाळीत वादळाचा मोठा फटका बसला. सोमवारी संध्याकाळी आलेल्या वादळाने अनेक घरांवरची छपरे उडाली आणि संसार उघड्यावर प़डले. अवघी पाच मिनिटे घोंघावलेल्या या वादळात शेकडो झाडे मुळापासून उन्मळून घरांवर तसेच रस्त्यांवर पडली. त्यामुळे सावर्डे परिसरात प्रचंड नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीत आलेल्या या वादळामुळे प्रकाशाचा हा सण या गावक-यांसाठी अंधार घेऊन आलाय.
Nov 5, 2013, 07:01 PM IST