रत्नागिरी

स्वाभिमान संघटनेच्या दोन पदाधिकाऱ्यांचा अपघातात मृत्यू

स्वाभिमान संघटनेच्या दोन पदाधिकाऱ्यांचा कोकणात रस्ते अपघातात मृत्यू झालाय. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड इथं हा अपघात झालाय.

Jul 20, 2014, 07:08 PM IST

कोकणात अतिवृष्टी, राजापुरात एक बळी

 रत्नागिरी जिल्ह्यात येत्या ७२ तासात वादळी वा-यासह मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला होता. सोमवारी संध्याकाळपासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. वादळी वाऱ्यांसह कोसळलेल्या पावसामुळे दोन्ही जिल्ह्यातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झालंय. राजापुरात पावसाचा एक बळी गेलाय.

Jul 15, 2014, 12:53 PM IST

कोकणात अतिवृष्टी, अनेक नद्यांना पूर

 रत्नागिरी जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू आहे. येत्या 24 तासांत अतिवृष्टीचा इशार हवामान खात्यानं दिलाय. तर 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहणार असल्यानं किनावरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. गेल्या 24 तासात संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी झालीय. सिंधुदुर्गात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालंय. सकाळपासून सिंधुदुर्गात जोरदार पाऊस सुरु आहे. 

Jul 12, 2014, 05:55 PM IST

कोकणात मुसळधार पाऊस, मुंबई-गोवा महामार्गावर दरड

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर आणि  रायगडमधील सुकेळी घाटात दरड कोसळल्याने वाहतुकीला अडथळा झाला. काही काळ मुंबई महामार्गावर एकेरी वाहतूक सुरु होती. दरड बाजुला केल्यानंतर वाहतूक पूर्वत झाली. दरम्यान, येत्या 48 मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Jul 11, 2014, 08:58 PM IST

रत्नागिरी कारागृहातून दोन आरोपी पळालेत

 रत्नागिरी जिल्हा कारागृहातून गुरुवारी पहाटे दोन आरोपी पळालेत. त्यामुळे कारागृहाची सुरक्षता धोक्यात आल्याचे उघड झाले आहे. पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. यातील एक आरोपी बलात्कार प्रकणी आणि दुसरा घरफोडी प्रकणात अटक करण्यात आली होती.

Jun 27, 2014, 04:41 PM IST

पावसाळ्याआधी कोकण रेल्वेची सुरक्षा चाचणी

 पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोकण रेल्वेच्या मार्गाची सुरक्षा पाहाणी केली जाते. यावर्षीही हा मार्ग सुरक्षित असल्याची खात्री सुरक्षा चाचणीच्या माध्यमातून करण्यात आली. मात्र या चाचणीनंतरही मार्ग सुरक्षित असल्याचा दावा करताना कोकण रेल्वेने कोकणाची निर्सगाची साथ मिळावी, अशी अशा व्यक्त केलीय.

Jun 26, 2014, 10:05 PM IST

सुमित्रा महाजन यांचा लोकसभा अध्यक्षपदासाठी प्रस्ताव

मुळच्या कोकणातल्या चिपळूणच्या असलेल्या इंदूरच्या खासदार सुमित्रा महाजन यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड जवळजवळ निश्चित झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच पक्षांच्या नेत्यांनी महाजन यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवलाय.

Jun 5, 2014, 11:35 PM IST

लोकसभा अध्यक्षपदी सुमित्रा महाजन, कोकणात आनंदोत्सव

लोकसभेच्या अध्यक्षपदी भाजपच्या ज्येष्ठ खासदार सुमित्रा महाजन यांचं नाव निश्चित झालंय. त्यांच्या निवडीनं कोकणातील रत्नागिरीमधील चिपळूणमध्ये आनंदोत्सव साजरा होत आहे. कारण एका चिपळूणकर कन्येला लोकसभा अध्यक्षपदी बसण्याचा बहुमान प्रथमच प्राप्त होणार आहे. चिपळुणात लहानाची मोठी झालेली ही मराठी मुलगी लोकशाहीतील या मानही चिपळूणची सर्वोच्च मुलगी मोठ्या स्थानावर विराजमान होत आहे.

Jun 5, 2014, 07:50 PM IST

यंदा बिबट्यांच्या संख्या वाढली, पण...

कोकणात बिबट्याची संख्या झपाट्याने कमी होत असल्याची आकडेवारी गेल्या काही वर्षात समोर येत होती. आता नव्याने जाहीर झालेल्या वनजीव गणणेत सकारात्मक चित्र समोर आलंय.

May 30, 2014, 08:22 PM IST