रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कारागृहातून गुरुवारी पहाटे दोन आरोपी पळालेत. त्यामुळे कारागृहाची सुरक्षता धोक्यात आल्याचे उघड झाले आहे. पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. यातील एक आरोपी बलात्कार प्रकणी आणि दुसरा घरफोडी प्रकणात अटक करण्यात आली होती.
दापोलीतील जालगाव येथे राहणारा किरण कृष्णा मोरे (२५) आणि केळसर आंबवली येथे राहणारा रितेश काशिनाथ कदम (२३) अशी पळालेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांनी कोठडीच्या बनावट चाव्या बनविल्या. या दोघांनी चादरीच्या सहाय्याने भितींवरून उड्या मारून धूम ठोकली. ही बाब तब्बल अडीच तासानंतर सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांच्या लक्षात आली.
किरणला घरफोडी प्रकरणात तर, रितेशला बलात्कार प्रकरणी अटक झाली आहे. हे दोघे कच्चे कैदी असून त्यांच्यावर अद्याप खटला सुरू आहे. गुरुवारी पहाटे यांनी बनावट चावीने कोठडीचे दार उघडले. झोपण्यासाठी मिळणा-या चादरीचे दोरखंड तयार करून त्यांनी भिंतीवरून उड्या मारल्या. या संदर्भात जिल्हा कारागृह अधिक्षकांनी शहर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी शहराची नाकेबंदी करून या आरोपींना पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे. मात्र, कोणीही हाती सापडलेत नाहीत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.