कोकणात पूरस्थिती, विद्यार्थी गेला वाहून
कोकणात जोरदार वृष्टी होत असल्याने अनेक नद्यांना पूर आलाय. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. चिपळूण, संगमेश्वर, राजापूर येथे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेय. तर पोलादपूर येथे १३ वर्षीय शालेय विद्यार्थी वाहून गेला.
Jul 3, 2013, 04:10 PM ISTकोकणात मुसळधार, रेल्वे-रस्ता वाहतुकीवर परिणाम
गेल्या दोन दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस होत आहे. याचा परिणाम मुंबई-गोवा रस्ता वाहतूक आणि कोकण रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे दरड कोसळ्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान, कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी हेल्पलाईन सेवा सुरू केलेय.
Jul 3, 2013, 08:30 AM ISTआली हो, राजापूरची गंगा
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे ९१ दिवसांत गंगेचा पुनरागमन झाले आहे. दर तीन वर्षांनी गंगा अवतरते. मात्र, वर्षभराच्या विक्रमी वास्तव्यानंतर निर्गमन झालेल्या गंगेचे दोन दिवसांपूर्वीच आगमन झाले आहे.
Jun 26, 2013, 04:05 PM ISTकोकण रेल्वेला पावसाचा तडाखा, रूळावर माती
विलवडे रेल्वे स्थानकाजवळ दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक सुमारे दीड तास खोळंबली होती. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा तडाखा विलवडे स्थानकाला बसला. पावसामुळे रूळावर माती आणि दगड आल्याने वाहतूक बंद पडली.
Jun 25, 2013, 02:26 PM ISTखेडजवळ झालेल्या अपघातात ११ जागीच ठार
रत्नागिरीत खेडजवळच्या दाबिळ गावाजवळ डंपर आणि क्वालीस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ११ जणांचा जागीच मृत्यू झालाय.
Jun 24, 2013, 03:16 PM ISTभास्कर जाधव ओसाड गावाचा पाटील – रामदास कदम
शिवसेनेचे उपनेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली. भास्कर जाधव हे ओसाड गावाचे पाटील आहे. शिवसेना हीच भास्कर जाधावांची ओळख आहे. त्यांना कितीही मोठे केले तरी पुढे कोण विचारणारे नाही, असे मत कदम यांनी यावेळी व्यक्त केले.
Jun 20, 2013, 10:12 PM ISTभरकटलेल्या जहाजाचं गुढ उकललंय!
रत्नागिरीतल्या समुद्रात भरकटलेल्या जहाजाचं अखेर गुढ उकललंय. इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं हे जहाज रत्नागिरीच्या मिऱ्या बंदरच्या समुद्रात विसावलंय. रविवारी हे जहाज समुद्रात दिसल्या नंतर अनेक अफवा उठल्या होत्या. मात्र आता या जहाजात संशयास्पद असं काहीच नसल्याचं स्पष्ट झालंय.
Jun 11, 2013, 01:45 PM ISTकोकणात मुसळधार पाऊस, वादळी नुकसान
मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर नैर्ऋत्य मोसमी वारे कोकणसह मुंबईमध्ये शनिवारी दाखल झाले. आतापर्यंत मान्सूनने राज्यातील कोकण, मराठवाडा, मध्य, उत्तर महाराष्ट्र व्यापला आहे. कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्ये चांगला पाऊस कोसळत आहे. येत्या ४८ तासांमध्ये जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
Jun 9, 2013, 10:22 AM ISTदेवरूखमध्ये जगभरातील गणरायाची रुपं
जगभरात आढळणाऱ्या गणरायाची विविध रुपं रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवरूखमध्ये बघायला मिळताहेत. एक फेरफटका मारूयात देवरूख कॉलेज ऑफ आर्ट अॅण्ड डिझाईनचा.
Apr 29, 2013, 03:29 PM ISTदाभोळ वीज प्रकल्प रिलायन्सच्या घशात जाणार?
दाभोळचा ‘रत्नागिरी गॅस अॅन्ड पॉवर’चा वीज प्रकल्प रिलायन्स ग्रुपला देण्याच्या हालचालींना वेग आलाय.
Mar 29, 2013, 12:29 PM ISTरत्नागिरीत विद्यार्थींनीचा बलात्कार करून खून
रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात एका शाळकरी विद्यार्थिनीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Mar 28, 2013, 04:16 PM ISTखेड अपघातानंतर सरकारला जाग, तरीही त्रुटी
मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरी करण्याच्या प्रस्तावाकडे राज्य तसेच केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. खेड येथे जगबुडी नदीत खासगी बस कोसळून ३७ ठार तर १५ जण जखमी झालेत. या अपघातानंतर सरकारला जाग आलेय. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामाचा पाठपुराव करण्याचे आश्वासन सरकारला द्यावे लागले तर ट्रॉमा केअर सेंटरचा तातडीने विचार करण्याचे स्पष्ट करण्यात आलेय.
Mar 20, 2013, 01:53 PM ISTरत्नागिरी बस अपघातातील जखमींची नावे
जखमींना डेरवण रूग्णालय, खेड नगरपालिका रूग्णालय आणि कळबनी ग्रामीण रूग्णालय या तीन रूग्णालयात दाखल केले आहे. यातील १४ जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
Mar 19, 2013, 05:44 PM ISTरत्नागिरी बस अपघातातील मृतांची नावे
प्रवाशांनी भरलेली एक खासगी बस जगबुडी नदीत कोसळून भीषण दुर्घटना घडलीय. या अपघातात ३७ जण ठार झाले आहेत.
Mar 19, 2013, 02:43 PM ISTअपघात : मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा संसदेत
मुंबई-गोवा महामार्गावर खेड येथे पहाटे खासगी बसला अपघात झाला. या अपघातात ३७ जण ठार तर १५ जण जखमी झालेत. या महामार्गावरील अरूंद रस्त्यांमुळे अपघातांत वाढ होत आहे. हाच मुद्दा धरून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरी करणाचा मुद्दा शिवसेनेचे खासदार अनंत गिते यांची उचलून धरला.
Mar 19, 2013, 01:57 PM IST