मुंबईसह महाराष्ट्रात भूकंपाचे धक्के
मुंबईला आज सकाळी ११. १ वाजण्याच्या दरम्यान भूकंपाचा धक्का बसला. तर संपूर्ण राज्यात हा भूकंप जाणवला. सकाळी १०.५८ वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर ४.९ अशी नोंद करण्यात आली आहे.
Apr 14, 2012, 02:42 PM ISTराजापूरची गंगा आली हो...
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरची गंगा प्रकट झाल्याने भाविकांची गर्दी होवू लागली आहे. दर तीन वर्षांच्या अंतराने प्रकटणारी गंगा यावेळी अवघ्या दहा महिन्यातच पुन्हा आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान भूगर्भातील हालचालीमुळे ही गंगा प्रकट झाल्याचे सांगण्यात येत आहे. काल (दि.११ एप्रिल) ला इंडोनेशियात ८.९ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपामुळे ही गंगा अवतल्याचे काहींचे म्हणणे आहे.
Apr 13, 2012, 08:21 AM ISTदापोलीत सापडला महाकाय मृत मासा
दापोली तालुक्यातील लाडघर समुद्र किनाऱ्यावर महाकाय मासा मृत अवस्थेत सापडला. हा देव मासा असण्याची शक्यता आहे. या माशाची लांबी १५ म्हणजेच सुमारे ४२ फूट तर त्याची गोलाई १६५ सेमी आहे. या माशाला पाहण्यासाठी लाडघर समुद्र किनाऱ्यावर गर्दी उसळली होती.
Mar 8, 2012, 11:07 PM ISTराज्यातील रिक्षाचालकांची मुजोरी कायम
महाराष्ट्र राज्यात बुधवारपासून डिजीटल मीटरची सक्ती करण्यात आली असली, तरी अनेक शहरांमध्ये मीटरप्रमाणं भाडे आकारणी होत नाही. त्यामुळे संतापाचे वातावरण आहे. मुंबईतील मीरारोड आणि नाशिकमध्ये तर मनमानी पद्धतीनं भाडे आकारणी सुरू आहे. तीन आसनी शेअर रिक्षांमध्ये सहा ते सात जणांना कोंबून परिवहन विभागाच्या आशीर्वादानं नाशिककरांची गळचेपी सुरू आहे. रत्नागिरी शहरातही रिक्षाचालकांची मुजोरी दिसून येत आहे. रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरील रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट चालली आहे.
Mar 2, 2012, 08:16 AM ISTकर्णबधीर कळ्या फुलांचे ‘आनंदी झाड’ !
कर्णबधीर या संस्थेची १९८४ साली झालेली स्थापना दापोलीतील संवेदनशील सामाजिक जाणीवेची प्रचीती देणारी आहे. शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी ही शाळा म्हणजे एक कुटुंब झाले असून या मुलांच्या सुखदु:खात हे कर्मचारी समरस झाले आहेत. यामुळेच या शाळेतून शिक्षण आणि व्यावसाईक शिक्षण घेतलेली मुले आज नोकरी आणि व्यवसाय स्वबळावर आत्मविश्वासाने करीत आहेत. हेच या संस्थेच्या कामाचे फलित आहे.
Feb 28, 2012, 03:22 PM ISTकोकणने का बदल स्वीकारलेत?
सुरेंद्र गांगण
कोकण म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो निसर्ग. मात्र, या निसर्गावर लाकूड व्यापाऱ्यांनी घाला घालून निसर्गाची पैशासाठी लूट केली आहे. महाराष्ट्रातील जवळपास निम्मा जंगलभाग हा कोकणात होता. आता हे प्रमाण घटत आहे. हे सांगण्याचे कारण की, कोकणच्या वातावरणाला पोषक असे उद्योग आले नाही. मात्र, वातावरण बिघडविणारे प्रकल्प आणले गेलेत. यातून राजकारणही केलं गेलं, ते आजही सुरू आहे.
आंगणेवाडी भक्तांवर घाला, २ ठार
संगमेश्वर येथे झालेल्या अपघातात ३ महिला ठार तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची स्थिती गंभीर असून त्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त कुटुंब मुंबईतील राहणारं आहे.
Feb 25, 2012, 09:20 AM ISTचित्रपटासाठी कोकण हॉट डेस्टिनेशन
पर्यटकांबरोबरच आता चित्रपट सृष्टीलाही रत्नागिरीबरोबरच दापोलीची भुरळ पडली आहे. रत्नागिरी परिसर आणि दापोलीत चित्रपटांचे चित्रिकरण करण्यास निर्माते प्राधान्य देऊ लागले आहेत. त्यामुळे हिंदी आणि मराठी सिनेमांचा दिग्दर्शकांचा
Jan 31, 2012, 12:20 PM ISTआघाडीत बिघाडी, कोकणाकडे लक्ष
कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात आघाडी न होता बिघाडी झाली आहे. त्यामुळे शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसचा कस लागणार आहे.
Jan 28, 2012, 05:04 PM ISTस्पर्धा माडाच्या झाडावर चढायची !
माडावर चढणं तुम्हाला कठीण वाटत असेल, पण आता ते सहजपणे शक्य आहे. कोकण कृषी विद्यापीठानं माडावर चढण्याकरता खास यंत्र विकसीत केलं आहे. या यंत्राच्या प्रसारासाठी त्यांनी माडावर चढण्याची स्पर्धा आयोजित केली होती.
Jan 28, 2012, 10:05 AM IST'त्या' हेलिकॉप्टरचं गूढ वाढलंय
रत्नागिरीत तीन महिन्यांपूर्वी उतरलेल्या हेलिकॉप्टरचं गूढ वाढलंय. हे हिलेकॉप्टर अचानक रत्नागिरीत लँड केल्यामुळे आयबीनं त्यावर संशय व्यक्त केलाय. या हेलिकॉप्टरमधल्या सगळ्यांची पुन्हा एकदा चौकशी करण्याचे आदेश आयबीनं दिलेत.
Jan 13, 2012, 05:19 PM ISTआजचा दिवस अपघातांचा
आज दिवसभरात राज्यात तीन ठिकाणी झालेल्या अपघातात १४ जण मृत्यूमुखी पडले. नवी मुंबईतील नेरुळ इथे ट्रक,टँकर आणि ओम्नीच्या विचित्र अपघातात एका दाम्प्त्याचा मृत्यू झाला. हे दाम्पत्य पुण्याचे असल्याचं वृत्त आहे.
Jan 1, 2012, 09:35 PM ISTथर्टीफर्स्टचे वेध, कोकण फु्ल्ल
कोकणाच्या पर्यटनाला आता नाताळ आणि थर्टीफर्स्टचे वेध लागले आहेत.गोव्याबरोबरच विदेशी पर्यटकांनी यावर्षी कोकणाला पसंती दिली आहे. रत्नागिरी आणि सिधुदूर्ग मिळून सुमारे तीन लाख पर्यटक कोकणात येत असून एम.टी.डी.सी.सह खासगी रिसॉर्टची आरक्षणं फूल झाली आहेत.
Dec 31, 2011, 08:45 AM ISTरत्नागिरीत मतदान
रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळी मतदानास सुरूवात झालीय. चार नगरपालिका आणि १ नगर पंचायतीसाठी निवडणूक होत आहे.एकून १०३ नगरपालिकांच्या जागांसाठी मतदान होत असून ३८२ उमेदावार रिंगणात आहेत.
Dec 11, 2011, 07:30 AM IST