रायगडात पाण्याचा दुष्काळ

रायगडात पाण्याचा दुष्काळ

दुर्गम भागातील महादेवाचा मुरा या गावाची व्यथा तर कुणाच्याही -हदयाला पाझर फोडेल अशीच आहे...इथं लोकवस्ती आहे पण रस्ते नाहीत..रस्ते नाहीत त्यामुळे कोणत्या सुविधाच गावात पोहचल्या नाहीत. रामभरोसे जीवन जगणा-या इथल्या गावक-यांना जणू शासनानं वाळीतच टाकलंय. त्यात भरीस भर म्हणून की काय पाणीटंचाईचं अस्मानी संकट गावक-यांवर कोसळलयं. खरं तर ही समस्या आजची नाही..पिढ्यानं पिढ्या इथं पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. पण ना त्याची राजकारण्यांना तमा, ना शासकीय अधिका-यांना....जिथं यंत्रणेलाच पाझर फुटत नाही तिथे निसर्गच मदतीला धावून येतो आणि इथल्या दगडालाही पाझर फुटतो.

Apr 13, 2012, 09:55 AM IST