Ranji Trophy 2025 : टीम इंडियाचा टेस्ट आणि वनडे कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने जवळपास एका दशकानंतर रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन केलं आहे. बीसीसीआयने टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटर्सना रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy 2025) खेळणे अनिवार्य केल्यामुळे रोहित मुंबईच्या संघाकडून गुरुवारी जम्मू काश्मीर विरुद्ध रणजी ट्रॉफीचा सामना खेळण्यासाठी उतरला. मुंबईच्या बीकेसी मैदानावर हा सामना सुरु असून यात रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल मुंबईकडून सलामी फलंदाजी करण्यासाठी उतरले, परंतु टीम इंडियाचे स्टार फलंदाज समाधानकारक धावसंख्या करण्यात फेल ठरले.
गुरुवारी मुंबईच्या बीकेसी मैदानावर मुंबई विरुद्ध जम्मू काश्मीर यांच्यात रणजी ट्रॉफीच्या सामन्याला सुरुवात झाली. या सामन्याचा टॉस मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने जिंकला आणि प्रथम फलंदाजी निवडली. यावेळी मुंबईकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल हे दोघे सलामी फलंदाजीसाठी मैदानात उतरले. मात्र यशस्वी 4 धावा करून आकिब नबीच्या बॉलवर LBW बाद झाला तर रोहित शर्मा देखील केवळ 3 धावा करून गोलंदाज पारस डोगराच्या बॉलवर बाद झाला. टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा सध्या वाईट फॉर्ममधून जात आहे. रोहितने तब्बल 9 वर्ष 3 महिन्यांनी रणजीमध्ये पुनरागमन केले होते मात्र येथे देखील तो फ्लॉप ठरला.
हेही वाचा : IND VS ENG : अर्शदीप सिंहने टी 20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; चहल, बुमराह, भुवनेश्वर सर्वांनाच टाकलं मागे
37 वर्षांचा रोहित शर्मा मागील अनेक सामन्यांमध्ये मोठी धावसंख्या करू शकलेला नाही. रोहितच्या नेतृत्वात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. रोहितने नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर गावसकर सीरिजच्या ३ सामन्यांमध्ये केवलेल्या 5 इनिंग दरम्यान 31 धावा केल्या.
रोहित शर्माने 2015 मध्ये शेवटचा रणजी ट्रॉफी सामना खेळला होता. यात रोहितने उत्तर प्रदेशच्या संघाविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर 113 धावांची खेळी केली होती. रोहित शर्माने 128 फर्स्ट क्लास सामन्यात 9290 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्कृष्ट धावसंख्या 309 इतकी आहे. तर रोहितने फर्स्ट क्लास सामन्यात गोलंदाजी करून 24 विकेट्स सुद्धा घेतल्या आहेत.
रोहित शर्मा, यशस्वी जायसवाल, अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकुर, शिवम दुबे, शम्स मुलानी, तनुष कोटियन, हार्दिक तमोरे (विकेटकीपर), मोहित अवस्थी, कर्ष कोठारी
पारस डोगरा (कर्णधार), शुभम खजूरिया, कन्हैया वधावन (विकेटकीपर), आकिब नबी, विवरांत शर्मा, यावर हसन, अब्दुल समद, आबिद मुश्ताक, युद्धवीर सिंह, उमर नजीर मीर, वंशज शर्मा