पी. कश्यपची आगेकूच!
पी कश्यप बॅडमिंटन ऑलिम्पिकच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारलीय. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरलाय. त्यानं श्रीलंकेच्या करुणारत्नेला अटतटीच्या लढतीत पराभूत केलंय. कश्यपमनं पहिला गेम 21-14 नं जिंकला.
Aug 1, 2012, 06:13 PM ISTतरूणींनी ऑलिम्पिकमध्ये 'जिंकून दाखवलं'
विधानपरिषेदवर बिनविरोध निवडून गेलेले आमदार हे हायकंमाडला किती मानतात याचा नमुना पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. काँग्रेस आमदार संजय दत्त यांनी लाळघोटेपणाची हद्दही पार केली.
Aug 1, 2012, 11:48 AM ISTलंडन ऑलिम्पिकमध्ये... 'ही पोरगी कोणाची?'
ऑलिम्पीक सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय दलात एक अज्ञात महिला आढळून आल्याचं प्रकरण समोर आलं आहे. भारतीय ऑलिम्पिक संघाने या बाबतची तक्रार आयोजन समितीला केलेली आहे.
Jul 28, 2012, 08:33 PM ISTअद्वितीय... 'ऑइल्स ऑफ वंडर'
२०४ देशांचा सहभाग... १० हजार अॅथलिट्स... २६ खेळ... ३०२ क्रीडाप्रकार आणि एक नाव... अर्थातच ऑलिम्पिक.
Jul 28, 2012, 08:08 AM ISTऑलिम्पिक : भारतीय तिरंदाजीचे दिसणार जलवे
लंडन ऑलिम्पिकमध्ये आज भारताला पहिल्याच दिवशी तिरंदाज स्पर्धक आपले जलवे दाखवू शकतील. त्यामुळे आजचा शुक्रवार भारतासाठी मेडलचा असेल. भारताच्या तिरंजाद टीमकडून पदकाची आशा आहे.
Jul 27, 2012, 11:25 AM ISTउत्सुकता लंडन ऑलिम्पिकच्या उद्घाटनाची
लंडननगरी ऑलिम्पिकसाठी सज्ज झालीय. ३० व्या ऑलिम्पिक खेळांना आजपासून लंडनमध्ये सुरुवात होतेय. भारतीय वेळेनुसार रात्री दीड वाजता या सोहळ्याला सुरुवात होणार आहे आणि तो पहाटेपर्यंत सुरू असेल. आता साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत त्या लंडन ऑलिम्पिकच्या रंगतदार ओपनिंग सेरेमनीवर...
Jul 27, 2012, 09:54 AM ISTबिग बीच्या हाती ऑलिम्पिकची मशाल
बॉलिवूडचा महानायक बिग बी अमिताभ बच्चन लंडनमधील ऑलिम्पिक स्पर्धेत ज्योत घेऊन धावणार आहे. लंडनमध्ये लिम्पिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ज्योत रिले स्पर्धेचे उद्या आयोजन करण्यात आले आहे. या रिलेत भाग घेण्याचा मान बिग बीला देण्यात आला आहे.
Jul 26, 2012, 05:42 PM ISTकलमाडींच्या ऑलिम्पिकवारीला क्रीडामंत्र्यांचा ब्रेक
इंडियन ऑलिम्पिकचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना ऑलिम्पिकचं निमंत्रण कोणी दिलं, याबाबत केंद्रीय क्रीडामंत्री अजय माकन यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. कलमाडी हे भारतीय डेलिगेशनचा हिस्सा असू शकत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
Jul 14, 2012, 08:47 AM ISTसानिया मिर्झाच्या आईला ऑलिम्पिकचं तिकीट!
ऑल इंडिया टेनिस असोसिएशननं अजून एक नवा वाद निर्माण केला आहे. सानिया मिर्झाच्या आईला टेनिस फेडेरेशननं ऑलिम्पिक टेनिस टीमच्या सपोर्ट स्टाफमध्ये सहभागी केल्यामुळेच एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
Jul 10, 2012, 10:00 PM ISTब्रिटनमध्ये सहा संशयीत दहशतवाद्यांना अटक
लंडन ऑलिम्पिकचा बिगुल वाजायला आता काहीच दिवस शिल्लक असताना ब्रिटीश पोलिसांनी गुरूवारी सहा जणांना संशयित दहशतवादी म्हणून अटक केली आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे.
Jul 5, 2012, 05:04 PM ISTऑलिम्पिकला अलकायदाचा धोका
अवघ्या महिन्यावर येऊन ठेपलेल्या खेळांच्या कुंभमेळा असलेल्या लंडन ऑलिम्पिकला अल कायदापासून धोका असल्याचा इशारा इंग्लंडची गुप्तहेर संघटना ‘एमआय - ५’ने दिला आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात असलेल्या जिहादींचा अरब मध्य-पूर्वेतील जगतामध्येही शिरकाव झाला असल्याने ही अत्यंत काळजीची बाब असल्याचे ‘एमआय-५’चे महासंचालक जोनाथन इव्हान्स यांनी सांगितले.
Jun 27, 2012, 05:05 PM ISTऑलिम्पिक खेळाडूंसाठी सडलेला ज्यूस...
आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या आणि सध्या लंडन ऑलिम्पिकची तयारी करत असलेल्या भारतीय कुस्तीपटूंना आपल्या भारतातच मिळालाय सडलेल्या फळांचा ज्यूस...
Jun 5, 2012, 05:50 PM ISTकाय चाललंय क्रीडा विश्वात !
लंडन ऑलिम्पिक, इंग्लिश प्रिमियर लीग,आयपीएल आणि टेनिस स्पर्धा यामध्ये काय चालल्यात घडामोडी, यावर टाकलेला धावता आढावा.
May 16, 2012, 03:01 PM ISTलंडन ऑलिम्पिकवर सायनाईड हल्ला चढवण्याचा कट?
ब्रिटन लंडन ऑलिम्पिकसाठी सज्ज होत असताना अल कायदाशी संबंधित काही धर्मांध माथेफिरू सायनाईडच्या हल्ला चढवण्याची योजना आखत असल्याचं वृत्त आहे.अल कायदाशी धागेदोरे असलेल्या एका वेबसाईटवर कट्टरपथीयांनी ऑलिम्पिक दरम्यान भयावह हल्ला चढवण्यासंदर्भात तपशीलवार सूचना पोस्ट केल्याचं वृत्त सन या वर्तमानपत्राने दिलं आहे.
Mar 26, 2012, 11:11 PM ISTलंडन ऑलिम्पिकच्या दरम्यान पाण्याचे दुर्भिक्ष्य?
लंडन ऑलिम्पिकच्या दरम्यान लंडन शहरात पाण्याच्या वापरावर निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. ऑलिम्पिक पार्क आणि स्पर्धा आयोजीत करण्यात आलेल्या लंडन आणि आसपासच्या परिसरात पाच एप्रिलपासून होसपाईपच्या वापरावर बंदी घालण्यात येणार आहे
Mar 13, 2012, 03:39 PM IST