`एस्सेल ग्रुप`चे अध्यक्ष सुभाष चंद्रा यांचा लंडन युनिव्हर्सिटीकडून गौरव!
एस्सेल ग्रुपचे अध्यक्ष सुभाष चंद्रा यांना ‘युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडन’ (UEL) कडून आज (१९ नोव्हेंबर रोजी) डॉक्टरेट प्रदान करण्यात येणार आहे.
Nov 19, 2013, 05:17 PM ISTबेबोला लंडनमध्ये मिळालं ‘सोनेरी मानपत्र’!
बॉलिवूड सूपरस्टार करिना कपूरचा ब्रिटनच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये गौरव करण्यात आलाय. एशिया सनडे न्यूजपेपर या वर्तमानपत्राच्यावतीनं भारतीय वंशाचे मेंबर ऑफ पार्लमेंट किथ वाझ यांच्या हस्ते बेबोला सोनेरी मानपत्र प्रदान करण्यात आलं.
Oct 30, 2013, 01:23 PM ISTअमेरिकेच्या हिलरी यांना लंडनमध्ये ठोठावला दंड
अमेरिकेच्या माजी प्रथम महिला आणि परराष्ट्रसचिव हिलरी क्लिंटन यांना अमेरिकेच्या भावी राष्ट्राध्यक्ष म्हणून पाहिले जाते; मात्र ही बाब लंडनमधील वाहतूक पोलीस अधिकार्यारवर कोणताही प्रभाव करू शकलेली नाही. पार्किंगसाठी तिकीट न घेता कार उभी केल्याबद्दल हिलरींना १३० डॉलरचा दंड ठोठावला गेला.
Oct 17, 2013, 03:53 PM ISTकरिना झाली ३३ वर्षांची, सैफनं दिली लंडनमध्ये पार्टी
अभिनेता सैफ अली खानसोबत गेल्यावर्षी विवाहबंधनात अडकलेली बॉलिवूडची ‘बेबो’ करिना कपूर आज ३३ वर्षांची झालीय. करिना आपला वाढदिवस लंडनमध्ये साजरा करतेय.
Sep 22, 2013, 10:01 AM ISTलंडनमध्ये करीनाचा ३३ वा वाढदिवस
अभिनेत्री करीना कपूर तिचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस खास सैफ अली खान सोबत करणार आहे. करीनाचा आज ३३वा वाढदिवस आहे. बेबो लंडनमध्ये जाऊन सैफच्या शूटिंग लोकेशनवर तिचा बर्थ डे सेलिब्रेट करणार असल्याचं समजतय.
Sep 21, 2013, 12:49 PM ISTडॉ. दाभोलकर हत्या सीसीटीव्ही फूटेज पाठवणार लंडनला
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणंचं सीसीटीव्ही फूटेज आता अधिक तपासणीसाठी लंडनला पाठवले जाणार आहे. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त शहाजी साळुंखे यांनी ही माहिती दिलीय.
Aug 30, 2013, 08:40 AM ISTकतरीनाची बहिण अडकली विवाह बंधनात!
बॉलिवूडची हॉट आणि सेन्सेशनल अभिनेत्री कतरीना कैफची बहिण नताशा रविवारी विवाह बंधनात अडकली. हा लग्नसमारंभ लंडनला झाला. त्यासाठी कतरीनाही लंडनला पोहोचली होती.
Aug 26, 2013, 12:44 PM ISTब्रिटिश तरुणीचा शीख वृद्धावर हल्ला
लंडनमध्ये १९ वर्षीय ब्रिटीश युवतीनं एका ८० वर्षीय शीख वयोवृद्धास बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडलाय. मारहाणीत शीख गृहस्थ गंभीर जखमी झाला असून युवतीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
Aug 19, 2013, 09:31 AM ISTदाऊदचा साथीदार इक्बाल मिर्चीचा मृत्यू
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा विश्वासू साथीदार आणि मुंबईमधील १९९३ च्या बॉंबस्फोटांमधील प्रमुख आरोपी इक्बावल मिर्ची याचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मिर्चीचा लंडनमधे मृत्यू झाल्याची माहिती आहे.
Aug 15, 2013, 03:09 PM ISTनरेंद्र मोदींनी मानले ब्रिटनचे आभार!
नरेंद्र मोदी यांना लंडनभेटीचे आमंत्रण मिळाले आहे. ब्रिटनमधील दोन प्रमुख राजकीय पक्षांनी मोदींना लंडनभेटीचे निमंत्रण दिले आहे. याबद्दल मोदांनी ट्विट करताना म्हटलं आहे, मला आनंद आहे. ज्या खासदारांनी प्रयत्न केले त्यांचा मी आभारी आहे.
Aug 14, 2013, 12:13 PM ISTनरेंद्र मोदी निघाले लंडनला!
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचा व्हिसा देऊ नये म्हणून काही भारतीय खासदारांनी फिल्डींग लावली. यावरून बराच वाद झाला. तर कट्टर हिंदूत्ववादी मोदी आहेत, असा ठपका ठेवत काही देशांनी मोदींना परदेश बंदी केली. मात्र, आता ब्रिटनने मोदींना व्हीसा देण्याची तयारी दाखविली आहे. त्यामुळे मोदींचा लंडन प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
Aug 14, 2013, 11:37 AM ISTसलमानच्या 'व्हिजा'चा प्रश्न अखेर सुटला!
सलमान खानच्या ‘किक’ या सिनेमांच्या शुटिंगची सुरूवात होण्याआधीच त्याला आलेल्या अडचनीतून आता तो बाहेर पडला आहे. पहिल्यांदा नकार मिळालेला असतांनादेखील त्यांला आता लंडनचा वीजा मिळाला आहे. आणि आता तो लंडनला शुटिंगसाठी जाणार आहे.
Aug 7, 2013, 12:13 PM ISTसलमान खानचा लंडन व्हिसा रद्द
बॉलिवुडचा सुपरस्टार सलमान खान याला लंडनचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. साजिद नडियाडवाला याच्या आगमी चित्रपटाच्या शुटिंगसाठी सलमानला लंडनला जायचे होते. परंतु त्याला लंडनचा व्हिसा नाकरण्यात आला असून या संदर्भात कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही.
Aug 2, 2013, 09:24 PM IST‘रॉयल बेबी’च्या जन्माची घोषणा करणारा भारतीय लंडनच्या वाटेवर...
इंग्लंडचा राजकुमार जॉर्जच्या जन्माची घोषणा करण्यात मदत करणारा शाही कुटुंबातला सेवक बदर अजीम हा रमजानचा महिना संपल्यावर पुन्हा लंडनला जावू शकतो.
Aug 2, 2013, 11:24 AM ISTस्कर्ट घालून मुले शाळेत...मुली झाल्यात हैराण
मुलं जर मुलींचे कपडे घालून वावरायला लागले तर काय मज्जा येईल ना. होय, तुम्ही बरोबर ऐकलत असचं झालयं ब्रिटनमधील काही शाळांमध्ये. ब्रिटनमधील काही शाळांतील मुलांनी तर अगदी कहरच केला आहे. तिथे विद्यार्थी शाळेमध्ये स्कर्ट घालून जात आहेत. मुलं असं म्हणतायत जर मुली पॅंट तसेच स्कर्ट घालू शकतात तर, मग आम्ही का नाही?
Jul 20, 2013, 01:01 PM IST