मोटारगाड्यांनी व्यापली मुंबापूरी
अशोक दातार
देशात वाहतुकीचे धोरण निश्चित करताना ते कार केंद्रीत आहे. आज जगभरातील देश अधिकाअधिक लोकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करावा यावर भर देतात. त्यासाठी बस रॅपिड ट्रान्सिट सिस्टिमला (बीआरटी) प्राधान्यक्रम देतात. दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका आणि चीनमध्ये तर ७९ शहरांमध्ये वाहतुकीसाठी ही व्यवस्था अवलंबण्यात आली आहे. रेल्वे प्रमाणे बसचा विचार करा असं सूत्र त्यामागे आहे.