भाजपच्या जास्त जागांचा आग्रह शिवसेनेनं मान्य करावं – पवार
लोकसभा निवडणुकीचा विधानसभेवर परिणाम होणार नाही असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधानसभा निवडणुकांचा प्रचार शुभारंभ आज कोल्हापूर इथल्या गांधी मैदानातून झाला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.
Sep 15, 2014, 07:06 PM ISTमुख्यमंत्री आयसीयूमधील पेशंटप्रमाणे अस्थिर - उद्धव ठाकरे
सुरक्षित मतदारसंघ मिळत नसल्यानं पृथ्वीराज चव्हाण यांचं मन अतिदक्षता विभागातील पेशंटप्रमाणे अस्थिर बनलं असल्याची टीका शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सामनाच्या अग्रलेखातून पृथ्वीराज चव्हाणांवर टीकास्त्र सोडण्यात आलं असून 'अतिदक्षता विभागातील पेशंट अनेकदा अर्धग्लानीत जाऊन असंबद्ध बरळतो तसं काहीसं राज्याच्या मावळत्या मुख्यमंत्र्यांचं झालं असल्याचं' लेखात म्हटलं आहे.
Sep 15, 2014, 05:11 PM ISTनारायण राणे कुडाळमधून निवडणूक लढवणार
नारायण राणे कुडाळमधून निवडणूक लढवणार आहेत. खुद्द नारायण राणेंनीच ही माहिती दिलीय. तसंच कणकवलीमधून नितेश राणेंचा एकमेव अर्ज आल्याचंही राणेंनी म्हटलंय. १७ सप्टेंबरला काँग्रेसची पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहितीही राणेंनी दिलीय.
Sep 14, 2014, 09:25 PM ISTमुख्यमंत्री दक्षिण कराड मधूनच निवडणूक लढतील?
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढणार, याबाबत चर्चा रंगली असताना त्यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांनी मुख्यमंत्री दक्षिण कराड मधूनच लढतील असे संकेत दिलेत.
Sep 14, 2014, 08:51 PM IST2009च्या निवडणुकीत मिळालेलं मतदान आणि टक्केवारी
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचं वेळापत्रक आज अखेर निवडणूक आयोगानं जाहीर केलं. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. १५ ऑक्टोबरला मतदान होणार असून १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. मात्र, याआधीच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा जिंकता आल्या होत्या. त्याची काय आहे टक्केवारी, याचा एक रिपोर्ट.
Sep 12, 2014, 08:33 PM ISTनिवडणुका जाहीर : राज्यात विभागवार काय आहे पक्षीय बळाबळ
महाराष्ट्र आणि हरियाणात एकसाथ आणि एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. १५ ऑक्टोबरला मतदान होणार असून १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. मात्र, याआधीच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला विभागवार किती जागा मिळाल्या होत्या. याचा एक रिपोर्ट.
Sep 12, 2014, 08:12 PM ISTमहाराष्ट्र, हरियाणा राज्याच्या निवडणुका जाहीर, आचारसंहिता लागू
गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या महाराष्ट्र आणि हरियाणा येथील विधानसभा निवडणुकीची आज घोषणा झाली. महाराष्ट्रात १५ ऑक्टोबरला निवडणूक तर हरियाणात २७ ऑक्टोबरला होणार आहे.
Sep 12, 2014, 04:46 PM ISTऑडीट मतदार संघाचे जळगाव २०१४
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2014, 10:16 PM ISTभ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या नेत्यांना भाजपात प्रवेश
माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झालीये. भाजप नेते पाचपुतेंवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करत होते मात्र भाजप प्रवेशानंतर त्यांच्यावरचे आरोप नाहीसे कसे झाले असा खोचक सवाल आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी केलाय.
Sep 6, 2014, 11:39 AM ISTराष्ट्रवादीला उमेदवारच मिळत नसल्याचे चित्र
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा करत असला तरी राष्ट्रवादीला अनेक मतदारसंघात उमेदवारच मिळत नाहीयत. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी सरकारविरोधात वातावरण असल्यामुळं या दोन्ही पक्षांकडे उमेदवारी मागणा-यांची संख्या घटल्याचं चित्र यावेळी दिसतंय.
Sep 6, 2014, 10:14 AM ISTव्हाट्सअॅपवर 'शहाणा हो...'चे पोस्टर, टोमणा भाजपला
महायुतीतील वादळ आता सोशल मीडियावर रंगू लागले आहे. शिवसेना-भाजप युतीचा विस्तार करताना छोटे पक्ष सोबत घेऊन 'महा'विस्तार करण्यात आला. मात्र, जागा वाटपाबाबतचे घोडे अजून गंगेत न्हाले नाही. याचवेळी भाजप अध्यक्ष अमित शहा उद्या मुंबईत येत आहे. त्याचवेळी सोशल मीडियावर 'शहाणा हो...'चे पोस्टर झळकतेय.
Sep 3, 2014, 07:44 PM ISTमहायुतीत धुसफूस सुरुच, नारायण राणे यांची टीका
आरपीआयनं भाजपकडे 8 जागांची मागणी केलीय. आरपीआयचे नेते अविनाश महातेकर, सुमंत गायकवाड यांनी आज भाजप नेते विनोद तावडेंची भेट घेऊन ही मागणी केलीय. दरम्यान, महायुतीवर काँग्रेस नेते नारायण राणे यांनी टीका करताना हल्लाबोल केला.
Sep 3, 2014, 03:47 PM ISTमनसेची बहुचर्चित 'ब्लू प्रिंट' अखेर जाहीर होणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बहुचर्चित ब्लू प्रिंटसाठी पुन्हा एकदा नवीन मुहूर्त जाहीर केला आहे.
Sep 3, 2014, 01:05 PM ISTमहायुती तुटणार? राजू शेट्टी, आठवलेंचा इशारा
जागावाटपाचा तिढा मिटत नसल्यामुळं आरपीआय महायुतीतून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. विधानसभा निवडणुकीत जिंकून येणाऱ्या आणि समाधानकारक जागा मिळाल्या नाहीत तर बाहेर पडण्याचा निर्वाणीचा इशारा आरपीआयनं दिलाय.
Sep 2, 2014, 08:38 PM IST'त्या' मुलींचं नाव 'शिवसेना'
कल्पता मांडून शिवसेनेला युट्युबवर प्रमोट करण्याचा प्रयत्न एका युवकाने केलाय. हातगाडी ओढणारे आजोबा विचारतात, मुलीनो तुमचं नाव काय, त्यावर त्या दोघी सांगतात, आमचं नाव शिवसेना.
Sep 2, 2014, 04:25 PM IST