पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारताचं चोख प्रत्युत्तर
पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. पूँछ सेक्टरमधील दिगवार भागात पाकिस्तानी सैन्यांनी अंदाधुंद गोळीबार केलाय.
Apr 3, 2017, 09:21 PM ISTभारतीय जवानांचे चोख प्रत्युत्तर पाकिस्तानचे तीन सैनिक ठार
सीमेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. रात्रभर गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानच्या जवानांना भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे तीन सैनिक ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर अनेक बंकर उद्धवस्त झाले.
Oct 26, 2016, 08:24 AM ISTपाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन , पाकिस्तानचे ४ रेंजर्स ठार
पाकिस्ताननं सीमेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू केलंय. काल पाकिस्तानी रेंजर्सनी BSFच्या छावणीवर गोळीबार केला. यात एक जवान शहीद झाला. प्रत्युत्तरादाखल भारतीय सैनिकांनी केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे ४ रेंजर्स ठार झालेत.
Jan 1, 2015, 11:27 AM ISTपाकला धक्का, यूनोचा काश्मीरप्रश्नी हस्तक्षेप करण्यास नकार
काश्मीर प्रश्नावर हस्तक्षेप करण्यास यूनोनं नकार दिलाय. संयुक्त राष्ट्रसंघानं या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी पाकिस्ताननं केली होती. भारत आणि पाकिस्ताननं एकत्र येऊन या प्रश्नावर तोडगा काढावा अशी संयुक्त राष्ट्रानं स्पष्ट केलं आहे.
Oct 14, 2014, 03:25 PM ISTभारतानं पाकच्या संयमाची परीक्षा घेऊ नये - मुशर्रफ
सीमारेषेवर पाकिस्तान सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असतानाच पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी शस्त्रसंधींच्या उल्लंघनासाठी भारतालाच जबबादार ठरवलं आहे. भारतानं पाकिस्तानच्या संयमाची परीक्षा घेऊ नये, असं मुशर्रफ यांनी म्हटलंय. तर मुशर्रफ यांना सध्या पाकिस्तानमध्येच कोणी गांभीर्यानं घेत नसल्यानं त्यांच्या विधानावर प्रतिक्रीया देणार नाही असा सणसणीत टोला भारताचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी लगावला आहे.
Oct 5, 2014, 01:45 PM ISTपाकिस्तान सैन्याकडून सीमा भागात गोळीबार
पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानच्या सैन्याने जम्मू काश्मीर येथील आरएस सेक्टरमधील पिंडी आऊटपोस्टवर गोळीबार केला.
Jul 12, 2014, 04:06 PM ISTपाकिस्तानकडून शस्त्रसंधी कराराचं उल्लंघन सुरूच
पाकिस्तानच्या सैन्याकडून शनिवारपासून सीमारेषेवर गोळीबार होत आहे. भारतामध्ये दहशतवादी घुसवण्यासाठी हा गोळीबार चालू आहे. पण भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानचा हा डाव धुळीस मिळवला आहे
May 4, 2014, 06:36 PM ISTपाकला चीन देणार अणुभट्टय़ा, भारताची तीव्र नाराजी
`शत्रूचा शत्रू तो आपला मित्र` या सूत्राचा अवलंब करत चीनने पाकिस्तानला दोन अणूभट्टय़ा देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, त्यामुळे भारतापुढे पेच निर्माण झाला आहे. भारताने याबाबत राजनैतिक व अधिकारी पातळीवर चीनकडे नाराजी व्यक्त केली असून अणुपुरवठादार गटाच्या कानावरही ही बाब घातली आहे.
Oct 17, 2013, 03:34 PM ISTपाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन
जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भिंबर गाली सेक्टरमध्ये भारतीय चौकीवर पाकिस्तानी सैन्याने आज पुन्हा गोळीबार केला. या गोळीबारात कोणताही भारतीय जवान जखमी झाल्याचे वृत्त नाही.
Oct 15, 2013, 03:43 PM ISTपुन्हा हल्ला; बीएसएफ जवान गंभीर जखमी
मुजोर पाकिस्तानी सैन्यानं रविवारी पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरच्या सीमेवर तसंच पूँछ भागातील बालकोट-मेंढरमध्ये गोळीबार केला. या हल्ल्यात बीएसएफचा एक जवान गंभीर जखमी झालाय.
Aug 12, 2013, 08:58 AM ISTहिंसेसाठी तयार राहा; हाफीजची भारताला चिथावणी
‘जम्मू आणि काश्मीर भागात आणखी हिंसेसाठी तयार राहा’ असा धमकीवजा संदेश हाफीजनं नवी दिल्लीला धाडलाय.
Jan 11, 2013, 11:55 PM ISTपाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, दोन भारतीय सैनिक शहीद
पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय हद्दीत प्रवेश करुन पेट्रोलिंग करणा-या भारतीय सैनिकांवर हल्ला केला. यामध्ये दोन भारतीय सैनिक शहीद झाले आहेत. तर दोन सैनिक जखमी झाले आहेत.
Jan 8, 2013, 08:10 PM IST