महाराष्ट्र-तेलंगणा सिंचन कराराला शिवसेनेचा आक्षेप
महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये काल झालेल्या सिंचन कराराला शिवसेनेनं आक्षेप घेतलाय. कृष्णा खोऱ्यातील 81 टीएमसी पाणी महाराष्ट्रानं घेण्यावर आक्षेप घेत तेलंगणानं सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. जोपर्यंत हा आक्षेप मागे घेतला जात नाही, तोपर्यंत गोदावरी पाणीवाटप करार करू नये, अशी भूमिका जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारेंना घेतली होती.
Aug 24, 2016, 05:13 PM ISTमहाराष्ट्र - तेलंगणामध्ये सिंचन करार, सिरोंचा ग्रामस्थांचा तीव्र विरोध
महाराष्ट्र आणि तेलंगणा सरकारमध्ये मेडीगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पाबाबत करार झालाय. या करारानुसार गडचिरोलीतील सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीवर पाच बॅरेजेस बांधण्यास तेलंगणाला मुभा देण्यात आली आहे. मात्र यामुळं अनेक गावं पाण्याखाली जाणार असल्याची भीती व्यक्त करत सिरोंचावासियांनी याला विरोध केलाय.
Mar 9, 2016, 10:32 AM IST