'...तर सोनियांना कुणीच रोखू शकलं नसतं'
'जर सोनियांना पंतप्रधान व्हायचं असतं तर त्यांना कुणीच रोखू शकलं नसतं,' अशी स्पष्टोक्तीच ए. पी. जे अब्दुल कलाम या पुस्तकात दिलीय.
Jun 30, 2012, 11:59 AM ISTप्रणव मुखर्जींचा काबूल दौरा रद्द
केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांचा काबुल दौरा रद्द झालाय. 14 जूनला प्रणव मुखर्जी काबूलच्या दौ-यावर जाणार होते. मात्र ऐनवेळी हा दौरा रद्द करण्यात आलाय. सोमवारी काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रणव मुखर्जी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा दौरा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.
Jun 12, 2012, 11:46 AM ISTपंतप्रधानांवरचे आरोप तथ्यहीन- सोनिया गांधी
दिल्लीत आज झालेल्या काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठकीत अध्यक्षा सोनिया गांधींनी टीम अण्णा आणि विरोधकांवर पलटवार केला. पंतप्रधान मनमोहन सिंग यांची पाठराखण करत सरकार आणि काँग्रेसवरील आरोप तथ्यहीन असल्याचा दावा सोनियांनी केला.
Jun 4, 2012, 01:48 PM ISTयापुढे भ्रष्टाचार सहन करणार नाही- सोनिया
भ्रष्टाचाराच्या मुद्यावर यापुढे कठोर भूमिका घेतली जाईल, असं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाच्या बैठकीत सुनावलं आहे. युपीए - २ला तीन वर्षे पूर्ण झाली.
May 22, 2012, 06:08 PM ISTकोण करतंय सोनियांची बदनामी?
अण्णा हजारेंच्या राज्यव्यापी दौऱ्यात सोनिया आणि राहूल गांधींची बदनामी करणारी पुस्तकं वाटण्यात येतात. पण, अण्णांना मात्र याचा थांगपत्ताही नसतो. ही घटना उघडकीस आलीय भंडाऱ्यामध्ये.
May 16, 2012, 06:37 PM ISTसगळ्यांचा बरोबर हिशोब होणार- सोनिया गांधी
देशातल्या विधानसभा निवडणुकीतल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधींनी काँग्रेस नेत्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. काँग्रेस खासदारांच्या बैठकीत सोनियांनी नेत्य़ांना खडे बोल सुनावले.
May 9, 2012, 02:18 PM ISTसचिन खासदार होणार?
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सचिनसमोर राज्यसभेच्या खासदारकीचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. स्पोर्टसच्या कोट्यातून नामनियुक्त सदस्य म्हणून सचिनने खासदार व्हावे, असा हा प्रस्ताव असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
Apr 27, 2012, 08:40 AM ISTसचिनने घेतली सोनियांची भेट
मा्स्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं १० जनपथवर सोनिया गांधीचीं भेट घेतली आहे. मास्टर-ब्लास्टर सचिन पत्नी अंजलीसह सोनियांच्या भेटीला गेला होता. त्यामुळे या भेटीमध्ये कशावर चर्चा झाली याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
Apr 26, 2012, 02:23 PM ISTशरद पवार भेटणार सोनिया गांधींना!
केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांच्या चर्चा करणार आहे. राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार निश्चितीबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
Apr 25, 2012, 04:34 PM ISTपदभारातून मुक्त करा, चार मंत्र्यांची इच्छा
केंद्रात सत्तेत असलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या चार कॅबिनेट मंत्र्यांनी आपले पद सोडण्याची इच्छा व्यक्त करत राजीमाना देण्याची तयारी दर्शविली आहे. यात काँग्रेसचे वरिष्ठ नेता वायलर रवि, सलमान खुर्शीद, गुलाम नबी आझाद आणि जयराम रमेश यांचा समावेश आहे. त्यामुळे आता सरकारसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
Apr 24, 2012, 06:19 PM ISTमुख्यमंत्र्यांवर हायकमांड नाराज ?
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारभारावर हायकमांड नाराज असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्या दिल्लीत अंतर्गत सुरक्षा परिषदेच्या बैठकीला दिल्लीला जाणार आहेत. मात्र ते पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना भेटतील काय हे निश्चित झालेलं नाही.
Apr 14, 2012, 08:16 PM ISTकाँग्रेसचा पराभव स्थानिक नेत्यांमुळे - सोनिया
पाचपैकी चार राज्यांतील निवडणूक निकालांमध्ये काँग्रेस पक्षाला दारूण पराभव पत्करावा लागला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी बोलल्या, आम्हाला धोका नाही. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारवर (यूपीए) याचा कोणताही परिणाम होणार नाही. आम्हाला जी अपेक्षा होती त्याप्रमाणात जनतेचा पाठिंबा मिळालेला नाही. आम्ही पराभव स्वीकारला आहे.
Mar 7, 2012, 10:36 PM ISTयुपीएच्या मानगुटीवर युपीचं भूत..
भलतचं धाडस राहुलबाबांच्या अंगाशी आलं आणि युपीत काँग्रेसला तोंडघशी पडावं लागलं. गरिबांचा कळवळा असल्याचं दाखवणा-या राहुलबाबांना युपीतल्या जनतेनं नाकारलं उलटं टॅब्लेटची स्वप्न दाखवणा-या आणि शेतक-यांना सोबत घेणारा अखिलेश त्यांना जवळचा वाटला. पण अपयशाची जबाबदारी स्विकारणा-या राहुल बाबांचा उदोउदो करणा-यांना वेळीच लगाम घालून चुकांमधून शिकणं काँग्रेससाठी अत्यावश्यक आहे नाहीतर मग युपी पॅटर्नची पुनरावृत्ती होणार आहे.
Mar 7, 2012, 10:31 PM ISTसोनिया गांधी भारतात परतल्या
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी भारतात परतल्या आहेत. त्या वैद्यकीय चाचणीसाठी २७ फेब्रुवारी रोजी परदेश दौऱ्यावर गेल्या होत्या. सोनिया गांधींवर सहा महिन्यांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
Mar 5, 2012, 03:40 PM IST'सोनिया गांधींना अमेरिकेतून हाकला'
अमेरिकेत उपचारासाठी गेलेल्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना तात्काळ अमेरिकेतून हाकलण्याची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी अमेरिकेतील एका शीख संघटनेने अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्याकडे केली आहे. याबाबतचे एक निवेदन या संघटनेने हिलरी यांना दिले आहे.
Mar 3, 2012, 04:37 PM IST