सोनिया गांधी ‘मदर इंडिया’ – सलमान खुर्शिद
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या केवळ राहुल गांधी यांच्या आई नसून संपूर्ण देशाची आई आहेत, असे वक्तव्य परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांनी आज करून पुन्हा एकदा वादाला तोंड फोडले आहे.
Dec 11, 2013, 06:50 PM ISTकाँग्रेसला व्हाईटवॉशची भीती, मिझोरमची मतमोजणी सुरू
काँग्रेसची राजकीय इभ्रत राखण्याची अखेरची आशा असलेल्या मिझोरमचा निकाल आज आहे. आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा वाढदिवशीस आहे. त्यामुळं त्यांना आज वाढदिवसाची भेट काय मिळते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
Dec 9, 2013, 08:50 AM ISTपक्षाला आत्मचिंतनाची गरज, सोनियांची कबुली
विधानसभा निवडणुकीतला पराभव मान्य करत पक्षाला आत्मचिंतनाची गरज असल्याचं मत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केलं.
Dec 9, 2013, 08:10 AM ISTपंतप्रधानपदाचा उमेदवार पक्ष ठरवेल- सोनिया
विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीचे मुद्दे वेगळे असतात. तरीही चार राज्यांमधील निकाल म्हणजे आमच्यासाठी जनतेने दिलेल्या सूचनाच आहेत. पराभवामुळे निराश नक्कीच आहोत; पण हा निकाल आम्ही स्वीकारत आहोत, अशा शब्दात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पराभव स्वीकारला आहे.
Dec 8, 2013, 07:09 PM ISTऐकलंत का... राणी एलिझाबेथपेक्षा सोनिया गांधी श्रीमंत!
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी या राणी एलिझाबेथ, ओमानचे सुल्तान, मोनॅकोचे राजे आणि कुवेतचे शेख यांच्यापेक्षाही श्रीमंत असल्याचा, दावा ह्युफिंग्टन पोस्ट वर्ल्डनं केलाय.
Dec 2, 2013, 05:11 PM ISTसोनिया गांधींच्या सभेवेळी विदर्भवादी नेत्यांची घोषणाबाजी
काँग्रेसच्या अ्ध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सभेच्या दरम्यान नागपुरात आज विदर्भवादी नेत्यांनी वेगळ्या विदर्भासाठी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. या नेत्यांनी सोनियांची सभा सुरु असताना मैदानात जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांमुळे तो अयस्वी ठरला.
Nov 21, 2013, 10:21 PM ISTसोनियांच्या सभेला एसटी महामंडळच दावणीला, अनेकांचे हाल
नागपूरमध्ये आज झालेल्या सोनिया गांधींच्या सभेचा मोठा फटता एसटी महामंडळाच्या वाहतुकीला बसला. या सभेत कार्यकत्यांना आणण्यासाठी काँग्रेस पक्षाने चक्क १५०० पेक्षा जास्त बसेस बुक केल्या होत्या. एकट्या चंद्रपूर विभागातूनमधून काँग्रेसने ५४६ आरक्षित केल्या होत्या. या गाड्या कमी पडल्यानेर आजूबाजूच्या तीन जिल्ह्यांतूनही गाड्या मागविल्या. त्यामुळे राजकीय शक्ती दाखवण्याच्या या अट्टहासाचा फटका चंद्रपूरसह विदर्भातील प्रवाशांना बसला.
Nov 21, 2013, 06:01 PM IST‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने’ची आज सुरुवात
राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची सुरुवात आज नागपुरात होणार आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या योजनेची सुरुवात करणार असून त्या निमित्तानं होणारी सोनियांची सभा यशस्वी होण्यासाठी प्रदेश काँग्रेसनं कंबर कसलीय. तर दुसरीकडं हा कार्यक्रम म्हणजे निवडणूक स्टंट असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.
Nov 21, 2013, 09:26 AM ISTसचिन `खासदार` सोनियांमुळेच - राजीव शुक्ला
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीच राज्यसभेत नियुक्ती करण्यासाठी सचिनचे नाव सुचविले होते. बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली. सचिन २००वी कसोटी खेळून नवृत्त होणार असला तरी सरकार निवृत्तीनंतर त्याला `भारतरत्न` हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्याबाबत विचार करू शकते, असे संकेतही शुक्ला यांनी दिले आहेत.
Nov 13, 2013, 05:55 PM ISTछत्तीसगडमध्ये मोदींसाठी `गुजरात`ची सुरक्षा!
आज भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेद्वार नरेंद्र मोदी यांच्या छत्तीसगडमध्ये तीन सभा होत आहेत. या सभेसाठी मोदींच्या भोवती गुजरातच्या आयपीएस अधिकाऱ्यांचा ताफा असल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
Nov 7, 2013, 01:31 PM ISTसोनिया आणि मोदींच्या सभेआधी १०० किलो स्फोटकं जप्त
छत्तीसगडमध्ये आज नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांच्या रॅलींचं आयोजन करण्यात आलंय. याआधीच राज्यातील वेगवेगळ्या भागांतू १०० किलोपेक्षा जास्त स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आल्यानं एकच खळबळ उडालीय.
Nov 7, 2013, 01:02 PM ISTमाझ्या आईने अश्रू ढाळलेत अन्नसुरक्षेसाठी – राहुल गांधी
देशाच्या जवळ ७० टक्के लोकसंख्येस अतिस्वस्त दरात अन्नपुरवठा करण्याची ग्वाही देणारे अन्नसुरक्षा विधेयक संसदेमध्ये संमत झाले, त्यावेळी प्रकृती ठीक नसल्याने गैरहजर असलेल्या माझ्या आईला दु:खावेग आवरता न आल्याने तिने अश्रूच्या सहाय्याने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या, असे ` काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी मध्य प्रदेशातील एका सभेत बोलताना सांगितले.
Oct 17, 2013, 06:34 PM IST२०१६ मध्ये सोनिया गांधी होणार रिटायर्ड?
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या २०१६ मध्ये ७० वर्षांच्या झाल्यानंतर राजकारणातून निवृत्त होणार असल्याचा, दावा पत्रकार-लेखक रशीद किडवई यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. `२४ अकबर रोड` या पुस्तकात किडवई यांनी हा दावा केला आहे.
Oct 9, 2013, 06:28 PM ISTअशोक चव्हाणांनी घेतली सोनिया गांधींची भेट
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यांना पक्ष संघटनेत जबाबदारी देण्यात येणार असून लवकरच त्यावर निर्णय घेतला जाणार आहे.
Oct 8, 2013, 09:28 PM ISTलालकृष्ण अडवाणींची ब्लॉगमधून राहुल, सोनियांवर टीका
दोषी आमदार-खासदारांबाबतच्या अध्यादेशावर राहुल गांधींची टीका आणि त्यानंतर सरकारनं अध्यादेश मागे घेणं यावर भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी मार्मिक शब्दांत भाष्य केले आहे. आपल्या ब्लॉगमधून सोनिया आणि राहुल गांधींना टार्गेट केलं.
Oct 4, 2013, 03:20 PM IST